Pune Crime : पैशांचे आमिष दाखवून करवून घेत होते वेश्याव्यवसाय; हिंजवडी पोलिसांनी सहा आरोपींची केली तुरुंगात रवानगी

| Updated on: May 21, 2022 | 2:42 PM

धाड टाकल्यानंतर येथे काही महिला आढळून आल्या. यात पाच पीडित महिलांची सूटका करण्यात आली आहे. आरोपी शुभम राजेंद्र ढेरे, योगेंद्र बाळू कुंभार आणि इतर चारजण हे पीडित महिलांना वेश्याव्यवसायाकरिता प्राप्त करून घेऊन त्यांना वेश्याव्यवसायाकरिता प्रवृत्त करत होते.

Pune Crime : पैशांचे आमिष दाखवून करवून घेत होते वेश्याव्यवसाय; हिंजवडी पोलिसांनी सहा आरोपींची केली तुरुंगात रवानगी
वेश्याव्यवसायप्रकरणी पीडित महिलांची पोलिसांनी केली सुटका
Image Credit source: tv9
Follow us on

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी (Hinjewadi) इथे एका हॉटेलवर छापा मारून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांसह सहा जणांच्या विरोधात वेश्या व्यवसायप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हिंजवडीमधील आर. के. एक्सक्लुसिव्ह इथे करण्यात आली. आरोपींनी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त (Prostitution) केले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, की दि. 18 मेरोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (A. H. T. U.) याद्वारे हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल R K exclusive ओयो लॉज यळवंडे वस्ती, आनंद नगर, लक्ष्मी चौकाजवळ, हिंजवडी येथे पिटा रेड करण्यात आली.

पाच पीडित महिलांची सुटका

धाड टाकल्यानंतर येथे काही महिला आढळून आल्या. यात पाच पीडित महिलांची सूटका करण्यात आली आहे. आरोपी शुभम राजेंद्र ढेरे, योगेंद्र बाळू कुंभार आणि इतर चारजण हे पीडित महिलांना वेश्याव्यवसायाकरिता प्राप्त करून घेऊन त्यांना वेश्याव्यवसायाकरिता प्रवृत्त करत होते. तसेच त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवित असताना मिळून आले.

हे सुद्धा वाचा

32 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 3 हजार रुपये रोख रक्कम, 29 हजार किंमतीचे तीन मोबाइल फोन आणि 30 रुपये किंमतीचे कंडोमची पाकीटे असा एकूण 32 हजार 30 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध PITA-1956चे कलम 3, 4, 5, 7 यासह भादंवि कलम 370 (3), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी असून आहेत. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत असून PI देवेंद्र चव्हाण, PSI सिसोदे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सुधा टोके, संगीता जाधव, भगवंता मुठे यांनी ही कारवाई केली आहे.