Weather Update : कुठे उष्णतेचा अलर्ट तर कुठे पावसाचा यलो अलर्ट, देशात ऊन, पावसाचा खेळ

Monsoon and weather Update : भारतीय हवामान विभागाने देशात कुठे हिट व्हेव दाखवली आहे. त्याचवेळी राज्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाची प्रतिक्षा असल्याचे म्हटले आहे. मान्सूनची प्रगती वेगाने सुरु झाली आहे.

Weather Update : कुठे उष्णतेचा अलर्ट तर कुठे पावसाचा यलो अलर्ट, देशात ऊन, पावसाचा खेळ
temperature and rain
| Updated on: May 23, 2023 | 11:12 AM

पुणे : उन्हाळ्यात यावर्षी वातावरणाचे विविध रंग पाहिले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात पाऊस पडला. मार्च महिन्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले. एप्रिल महिन्याने पावसाचा सर्व उच्चांक मोडला. मे महिन्याच्या सुरुवातीला घरातील कुलर एसी आणि पंखे बंद होते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊ लागली. आता पुन्हा वातावरणाचे विविध रंग दिसत आहे. कुठे हिट व्हेवचा ईशारा दिला आहे तर कुठे पावसाचे ईशारा दिला आहे. दुपारी कडक ऊन असते तर संध्याकाळी पाऊस असतो.

काय आहे अंदाज

पुढील 4,5 दिवस राज्यातील काही भागांत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर काही ठिकाणी वातावरण आकाश ढगाळ राहण्याची शक्यता पुणे हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बिहारमध्ये उष्णतेची लाट, मध्य प्रदेशात पाऊस

बिहारमध्ये उष्णतेची लाट सुरु आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशात पाऊस पडत आहे. रांचीमध्ये तापमान ४६ अंशांवर गेले आहे. दिल्लीत यलो कार्ड जारी केले आहे. वायव्य भारतातील पश्चिम अडथड्यांमुळे पूर्व हिमालय भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. २३ ते २५ मे दरम्यान पाऊस पडणार आहे.

मान्सूनचा काय आहे अंदाज

स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून 7 जूनपर्यंत पोहोचणार आहे. विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे. परंतु सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची प्रगती अशीच राहिल्या केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो.

विदर्भात पाऊस

विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं एकीकडे राज्यात उष्णतेची लाट असताना विदर्भात ढगाळ वातावरणामुळे काहीसा दिलासा म्हणता येईल. विदर्भात तापमान 40 अंशापर्यंत खाली येणार आहे. पाच दिवसानंतर तापमानात पुन्हा वाढ होणार आहे, अशी माहिती नागपूर IMD चे वरिष्ठ शास्रज्ञ गौतम नगराळे यांनी दिली.