Pune Ganesha : पुण्यात यंदा नऊ गणेशोत्सव मंडळांची एकत्रित आगमन मिरवणूक, तर दगडूशेठ मंदिरात साकारणार पंचकेदार मंदिर

| Updated on: Aug 22, 2022 | 9:11 PM

अशोक गोडसे यांच्या निधनानंतर अध्यक्षपद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. यावर्षी दगडूशेठ गणपती उत्सव अध्यक्षा विनाच हा गणेशोत्सव पार पडणार आहे.

Pune Ganesha : पुण्यात यंदा नऊ गणेशोत्सव मंडळांची एकत्रित आगमन मिरवणूक, तर दगडूशेठ मंदिरात साकारणार पंचकेदार मंदिर
पुण्यात यंदा नऊ गणेशोत्सव मंडळांची एकत्रित आगमन मिरवणूक
Image Credit source: t v 9
Follow us on

पुणे : कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर यंदा पहिल्यांदा पुन्हा गणेश उत्सव होणार आहे. पुण्यातील गणेश मंडळांचा आदर्श उपक्रम राहणार आहे. पुणे शहरातील एकूण नऊ सार्वजनिक गणेश मंडळे (Public Ganesha Mandals) एकत्र येणार आहेत. नऊ गणेश मंडळे एकत्रित मिरवणूक काढणार आहेत. गणरायांच्या आगमनाची मिरवणूक शहरातील नऊ गणेश मंडळे एकत्रीतरित्या काढणार असल्याचं यंदाचा गणेशोत्सव खास राहणार आहे. 31 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या दरम्यान निघणार गणेश मंडळांची एकत्र मिरवणूक निघेल. त्यासोबतच एकत्रित येत ही गणेश मंडळे जवळपास 75 सामाजिक उपक्रम (Social Activities) राबविणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट पंचकेदार मंदिर साकारणार आहेत. भगवान शिवशंकराच्या (Shiv Shankar) निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्री पंचकेदार मंदिर आहे.

31 हजार महिलांच अथर्वशीर्ष पठण

एक सप्टेंबरला सकाळी 6 वाजता 31 हजार महिलांच अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम पार पडणार आहे. सुरक्षेसाठी 150 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. अखेर श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराला मिळणार अध्यक्ष मिळणार आहे. 15 सप्टेंबरला दगडूशेठ गणपती ट्रस्ट अध्यक्षाची निवड होणाराय. अशोक गोडसे यांच्या निधनानंतर अध्यक्षपद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. यावर्षी दगडूशेठ गणपती उत्सव अध्यक्षा विनाच हा गणेशोत्सव पार पडणार आहे.

मोदकाचा प्रसाद मिळणार

तिरुपती बालाजीसारखा प्रसाद यावर्षीपासून देण्यात येणार आहे. बालाजीला लाडू देतात तर दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टकडून मोदक देण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाची परंपरा जपण्यासाठी पुण्यातील गणेश मंडळांनी हा निर्णय घेतला. गणेश मंडळांना एकत्र येऊन एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळं मंडळांमध्ये एकोपा असल्याचा संदेश लोकांपर्यंत जाईल. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रसाद हा मोदकाचा राहणार आहे. गणेशोत्सवाची परंपरा जपणे हा यामागचा उद्देश आहे.

हे सुद्धा वाचा