Pune Corona Update | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या शंभरीच्या खाली, 233 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

कोरोनाशी (Corona) लढणाऱ्या पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 24 तासांत पुणे शहरात (Pune City) नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्यांची संख्या १०० च्या खाली आली आहे.

Pune Corona Update | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या शंभरीच्या खाली, 233 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज
corona
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 7:02 PM

पुणे : कोरोनाशी (Corona) लढणाऱ्या पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 24 तासांत पुणे शहरात (Pune City) नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्यांची संख्या 100 च्या खाली आली आहे. आज नव्याने 97 कोरोनाबाधितांची नोंद पुणे शहरात झाली आहे. तर 233 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासांत 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (In the last 24 hours, the number of newly diagnosed coronaviruses in Pune has come down to less than 100)

205 रुग्णांची स्थिती गंभीर

पुणे शहरात सध्या 1936 कोरोनाबाधितांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये 205 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांची संख्या 491959 एवढी झाली आहे तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 481133 झाली आहे. पुणे शहरात आतापर्यंत 8890 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत पुण्यात 5,778 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा हा 3068021 वर गेला आहे.

तिसरी लाट आली तरी सरकार तयार – टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चेवर भाष्य केलं आहे. नीती आयोगाने कोरोनाची जी तिसरी लाट येणार असल्याचे म्हटले होते. नीती आयोगाच्या पत्राची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नीती आयोगाचे जून महिन्यातील पत्र असून त्यावरुन सध्या चर्चा सुरु असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. आपल्याला सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही. तरी, पण आपण तिसऱ्या लाटेचा अंदाज घेत आहोत. राज्य शासन तिसरी लाट आली तरी तयार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते आज जालन्यात बोलत होते.

शाळा महाविद्यालय कधी उघडणार?

राज्यातील मंदिरे आणि शाळा कॉलेज सध्या तरी उघडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच मंदिर आणि शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

Breaking | तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारकडून औषध खरेदीला मंजुरी

कोरोना काळात राजेश टोपेंचं काम कौतुकास्पद, खासदार सुप्रिया सुळेंचं प्रशस्तीपत्र

कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये? राज्यात नीती आयोगाच्या पत्राची चर्चा; ते पत्र कधीचं? राजेश टोपेंनी थेट सांगितलं