AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये? राज्यात नीती आयोगाच्या पत्राची चर्चा; ते पत्र कधीचं? राजेश टोपेंनी थेट सांगितलं

राज्यातील मंदिरे आणि शाळा कॉलेज सध्या तरी उघडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच मंदिर आणि शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये? राज्यात नीती आयोगाच्या पत्राची चर्चा; ते पत्र कधीचं? राजेश टोपेंनी थेट सांगितलं
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 2:40 PM
Share

जालना : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चेवर भाष्य केलं आहे. नीती आयोगाने कोरोनाची जी तिसरी लाट येणार असल्याचे म्हटले होते. नीती आयोगाच्या पत्राची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नीती आयोगाचे जून महिन्यातील पत्र असून त्यावरुन सध्या चर्चा सुरु असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. आपल्याला सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही. तरी, पण आपण तिसऱ्या लाटेचा अंदाज घेत आहोत. राज्य शासन तिसरी लाट आली तरी तयार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

शाळा महाविद्यालय कधी उघडणार

राज्यातील मंदिरे आणि शाळा कॉलेज सध्या तरी उघडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच मंदिर आणि शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

जनआशीर्वाद यात्रेतील गर्दी टाळावी

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कुठल्याही बाबतीत गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती

सात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक

सात जिल्ह्यामध्ये कोरोना संख्या जरी वाढली असली तरी काळजी वाढवी अशी परिस्थिती नाही. मात्र आमचं लक्ष आहे त्यावर,इकडे लसीकरण वाढवण्याचा विचार आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे जरी संक्रमण होत असले तरी त्याची लक्षणं सौम्य आहेत, मात्र, डेल्टा प्लस वेरिएंटमध्ये संक्रमण अधिक करण्याची क्षमता आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

कोरोना लस घेतल्यानंतरही सतर्क राहा

लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, असं समजू नये. संसर्ग होऊ शकतो. संसर्गाची परिणामकारकता लसीमुळं कमी होऊ शकते. लसीमुळे त्या व्यक्तींना आयसीयूची गरज लागणार नाही. ऑक्सिजनची गरज लागणार नाही. अमेरिका आणि इतर देशांमध्ये लसीकरण झालंय त्या ठिकाणी संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असला तरी मृत्यूदर कमी झालेला दिसतो. त्यामुळं नागरिकांनी कोरोना लस घेतली असली तरी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. लस नाकातून घ्यायची की दंडातून घ्यायची यासंदर्भात आयसीएमआर आम्हाला मार्गदर्शन करत असते, ते सांगतील तसा लसीकरणाचा कार्यक्रम आम्ही राबवू, असं राजेश टोपे म्हणाले.

इतर बातम्या:

Narayan Rane | 32वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

‘मी कायद्याचं पालन करतो, जेव्हा हवं तेव्हा ईडीला सामोरं जाईन’, अनिल देशमुखांची भूमिका

Rajesh Tope said Corona Third wave predictions based on Niti Ayog letter in June

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.