PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन झालं आज त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे – महापौर मुरलीधर मोहळ

मुळा आणि मुठा नदीच्या योजनेचा शुभारंभ होत आहे. 841  कोटी रुपये केंद्राने दिले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होत आहे. जावडेकर, बापट आणि गडकरींनी या प्रकल्पासाठी महत्त्वाचे योगदान दिलं. फडणवीसांनी गेल्या दोन महिन्यांपासून यात विशेष लक्ष घातलं. आता नद्यात गढूळ पाणी जाणार नाही आज पाच हजार कोटींचा एक प्रकल्प सुरू होत आहे.

PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन झालं आज त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे - महापौर मुरलीधर मोहळ
mayor murlidhar mohal
| Updated on: Mar 06, 2022 | 1:44 PM

पुणे – बऱ्याच वर्षापासून आपण जे स्वप्न पाहत होतो त्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते मेट्रोचं भूमिपूजन झालं त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे. ही महत्त्वाची घटना आहे. 60  वर्षानंतर पंतप्रधान पुण्यात आले. छत्रपती शिवाजी  महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) जे आदर्श विचार मांडले जे तत्व मांडले त्याची प्रेरणा राजकीय मंडळी घेतील. मुळा आणि मुठा नदीच्या(Mula and Mutha  Rivers )  योजनेचा शुभारंभ होत आहे. 841  कोटी रुपये केंद्राने दिले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होत आहे. जावडेकर, बापट आणि गडकरींनी या प्रकल्पासाठी महत्त्वाचे योगदान दिलं. फडणवीसांनी गेल्या दोन महिन्यांपासून यात विशेष लक्ष घातलं. आता नद्यात गढूळ पाणी जाणार नाही आज पाच हजार कोटींचा एक प्रकल्प सुरू होत आहे. असल्याची माहिती महपौर मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे

नदी काठावर जॉगिंगच्या सुविधा

साबरमतीच्या धर्तीवर मुळा आणि मुठा नदी विकसीत होणार आहे. 44किलोमीटरच्या या नद्यांपैकी 9 किलोमीटरच्या नद्यांचं विकासाचं काम सुरू होणार आहे. नदीकाठ बनवला जाईल. जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅकसह हरित पट्टे या नद्यांभोवती करणार आहोत. असेही ते म्हणाले आहेत.

पीएम आवाज योजने अंतर्गत सव्वालाख घरे बांधणार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. 143 ई बसेसचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. गेल्या तीन वर्षात 1500  ईबसेस आणि सीएनजी बसेस आणल्या. देशातील पहिला ई बस डेपो पुण्यता झाला. गडकरींच्या आग्रहास्तव हे करण्यात आलं. आर के लक्ष्मण यांच्या नावाने आर्ट गॅलरी करत आहोत. स्वच्छ सर्व्हेक्षणात तीन वर्षापूर्वी 37 व्या स्थानावर असलेलं पुणे शहर पाचव्या स्थानावर आहे. पीएम आवाज योजने अंतर्गत सव्वालाख घरे बांधणार आहोत. दहा हजार घरे बांधलेही आहे. राहण्यासाठीचं योग्य शहर म्हणून पुणे पुढे आलं आहे.

‘आज पुण्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, पुण्याची स्वत:ची मेट्रो धावली’ – देवेंद्र फडणवीस

नागपूरची मेट्रो वेगाने झाली, पिंपरी-ठाणेसाठी मदत करा; अजित पवारांची मोदींना राजकारण न करण्याची ग्वाही

Video | पंतप्रधान मोदींचा दिव्यांगांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास; दिलखुलास गप्पांचा फडही रंगला…!