Pune JCB accident : रस्त्याचा अंदाज न आल्यानं पुण्यातल्या भोरमध्ये जेसीबी थेट विहिरीत; थोडक्यात बचावला चालक

याठिकाणी तीव्र उतार आहे. त्याचबरोबर वळणही असल्याने चालकाला अंदाज आला नाही. शिवाय रस्त्याच्या कडेलाच विहीर असल्याने ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. भोर (Bhor) तालुक्यातील कारी या गावात हा प्रकार घडला आहे.

Pune JCB accident : रस्त्याचा अंदाज न आल्यानं पुण्यातल्या भोरमध्ये जेसीबी थेट विहिरीत; थोडक्यात बचावला चालक
पुण्यातील भोरमधील कारीत जेसीबी कोसळला विहिरीत
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 29, 2022 | 10:44 AM

पुणे : जेसीबी (JCB) विहिरीत पडल्याने अपघात झाल्याचा प्रकार पुण्यातील भोरमध्ये घडला आहे. रस्त्याच्या कडेलाच ही विहीर आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेतली. यातील चालकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र विहिरीत पडल्याने किरकोळ जखम (Minor injured)चालकाला झाली आहे. याठिकाणी तीव्र उतार आहे. त्याचबरोबर वळणही असल्याने चालकाला अंदाज आला नाही. शिवाय रस्त्याच्या कडेलाच विहीर असल्याने ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. भोर (Bhor) तालुक्यातील कारी या गावात हा प्रकार घडला आहे. जेसीबीमध्ये एकच व्यक्ती बसू शकते, त्यामुळे येथे मोठी दुर्घटना टळली, मात्र भविष्यात अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण रस्त्याच्या कडेलाच विहीर असल्याने येथे अपघाताचा धोका नेहमीच असणार आहे.

विहिरीला कुंपण/कठडे हवे

समोर आलेल्या छायाचित्रात आपल्याला स्पष्ट दिसते, की विहिरीला कोणत्याही प्रकारचे कुंपण नाही. त्यात ही विहीर रस्त्याच्या अगदी कडेला असल्याचे समजते. वाहनचालकाच्या थोड्याशा दुर्लक्षामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विहिरीच्या मालकाने त्वरीत येथे कुंपण घालणे गरजेचे आहे. अनेकवेळा विहिरींचे अर्धवट काम एखाद्याच्या जीविताला धोकाही निर्माण करू शकते. ग्रामीण भागात अशा अनेक विहिरी आहेत, ज्यांना कुंपण किंवा कठडे नाहीत. नवीन व्यक्तींना याचा फटका बसण्याची शक्यता असते.

नवीन रस्त्याने जात असताना अधिक खबरदारी गरजेची

ग्रामीण भागात अनेकवेळा गर्दी नसल्याच्या कारणाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनाचा वेग मर्यादित असायला हवा. कधी तीव्र उतार तर कधी मोठमोठे खड्डे प्राणघातक ठरू शकतात. तीव्र उतारावर तर वाहनाची गती अत्यंत कमी हवी, अन्यथा वाहन अनियंत्रित होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते. येथे जेसीबीच्या बाबतीतही हेच दिसून येते. नवीन रस्त्याने जात असताना अधिक सावधानता बाळगणे गरजेचे बनते.

आणखी वाचा :

Pune Samir Bagsiraj : देवदूत बनून आला अन् चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर! पुण्याच्या समीर बागसिराज यांचं सर्व स्तरातून कौतुक

Pune Hapus : हापूस आला टप्प्यात..! पुण्याच्या मार्केटयार्डात आवक वाढली; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दरही कमी

Krishnaprakash : ‘वक्त तो वक्त है’ म्हणत व्यक्त झाले आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश; बदलीवर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण