AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune ST Accident : ब्रेक फेल झाल्यानं धडकली एसटी; पुण्यातल्या शंकर महाराज पुलावरचा थरार, तीन जखमी

एसटीचा ब्रेक फेल झाल्यानंतरचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ब्रेक निकामी झाल्याने अखेर चालकाला ती दोन-तीन ठिकाणी धडकवावी लागली. वाहतूक पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी अपघातानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातात तीन जण जखमी झाल्याचे समजते.

Pune ST Accident : ब्रेक फेल झाल्यानं धडकली एसटी; पुण्यातल्या शंकर महाराज पुलावरचा थरार, तीन जखमी
शंकर महाराज पुलावर झालेला एसटीचा अपघातImage Credit source: tv9
| Updated on: Apr 28, 2022 | 2:48 PM
Share

पुणे : पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर आज एसटीचा भीषण अपघात (ST Accident) झाला. एसटीचा ब्रेक फेल झाल्‍याने तीन ते चार दुचाकीस्‍वारांना एसटीने उडवले तसेच एका कारलाही धडक दिली. दुसऱ्या वाहनांशी अपघात टाळण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी चालकाने गाडी धडकवल्‍याचे दिसून येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र तीन जण जखमी झाल्याचे समजते. अपघातानंतर जखमींना भारती हॉस्पिटलमध्ये (Bharti hospital) दाखल करण्यात आले. घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. कारण अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. काही काळ गोंधळाचे वातावरण रस्त्यावर झाले होते. यावेळी वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. या एसटीचा ब्रेक फेल झाल्याने ती दोन तीन ठिकाणी चालकाने धडकवली. याचदरम्यान तीनजण जखमी झाले.

आणखी वाचा :

Pune crime : बेकायदा ताडी विक्री अन् सेवन; आंबेगावातील शिनोलीतल्या अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना पोलिसांनी केली अटक

Krishnaprakash : ‘वक्त तो वक्त है’ म्हणत व्यक्त झाले आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश; बदलीवर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

Pune Child marriage : बालविवाह पडला महागात; पतीसह मुलीच्या वडिलांवर पुण्यातील चाकण पोलिसांत गुन्हा दाखल

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.