Ketan Agarwal Case: सियाचा खेळ खल्लास! सर्वात मोठा पुरावा हाती, केतनच्या वडिलांनीच…

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्याप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. त्यामुळे आता सियाचे काही खरे नाही.

Ketan Agarwal Case: सियाचा खेळ खल्लास! सर्वात मोठा पुरावा हाती, केतनच्या वडिलांनीच...
केतन अग्रवाल
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 28, 2026 | 10:09 AM

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी लोढा सोसायटीतील रहिवासी एकत्र आले आहेत. सोसायटीतील गणपती मंदिरापासून केतनच्या घरापर्यंत भावपूर्ण कॅंडल मार्च काढण्यात आला. याचे आयोजन सोसायटीच्या रहिवाशांनी केले होते. कॅंडल मार्चमध्ये केतनचे आई-वडीलही सहभागी झाले. या वेळी केतनच्या आई-वडिलांचे डोळे भरून आले आणि त्यांना आपल्या मुलाच्या जाण्याची जाणीव वारंवार होत राहिली. हे संपल्यानंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि एक महत्त्वाची अपीलही केली.

केतनच्या वडील काय म्हणाले?

“मी फक्त एवढंच सांगणार आहे की, सर्वांनी एकत्र येऊन केतनला न्याय मिळवून द्यावा. या लढ्यात प्रत्येकाने समोर यायला हवे. ज्या लोकांनी त्या दिवशी किल्ल्यावर केतनच्या हत्येचा प्रकार पाहिला आहे, त्यांनी सर्वांनी पुढे यावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” असे विशाल अग्रवाल म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “खूप लोक मेसेज पाठवत आहेत की आम्ही तिथे होतो, आम्ही हे बघितले, ते बघितले. पण काही लोक पोलिसांसमोर येण्यास घाबरत आहेत. मी त्यांना आश्वासन देतो की, त्यांना कोणताही त्रास होणार नाही.”

फाशीचीच शिक्षा हवी

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी गुन्हेगाराला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली. “गुन्हेगाराला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा असल्यास तीही द्यावी,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी त्यांनी केतनला श्रद्धांजली वाहिली आणि हातात फलक घेऊन न्यायाची मागणी केली.

तपासातील नवीन माहिती

पुणे पोलिसांनी शुक्रवारी आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याची सुमारे १० तास चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, साहिल चेतन चौधरीला ओळखतो. त्याने सांगितले की, चेतन आणि सियाची मैत्री क्रिकेट सामन्यादरम्यान झाली होती.

सोशल मीडियावर समोर आला नवा व्हिडिओ

केतन अग्रवाल खून प्रकरणात एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात आरोपी सिया गोयल तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबत महाराष्ट्र क्रिकेट लीगचा सामना पाहताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us