AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxman Hake: हल्याकडून दूध मिळणार नाही तर … लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंना खणखणीत टोला… काय दिला मोठा सल्ला?

Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी रखरखत्या उन्हात उपोषणाची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या दहा महिन्यात पूर्ण न केल्याने त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्याचवेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना खणखणीत टोला लगावला आहे.

Laxman Hake: हल्याकडून दूध मिळणार नाही तर ... लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंना खणखणीत टोला... काय दिला मोठा सल्ला?
लक्ष्मण हाके, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 28, 2026 | 2:02 PM
Share

Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात शड्डू ठोकले आहेत. मराठा आरक्षणाविषयीच्या अनेक मागण्या दहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याने त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी 30 मे रोजीपासून रखरखत्या उन्हात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. उन्हाचा फटका बसून जर काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असे जरांगे म्हणाले. तर आता प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खणखणीत टीका केली आहे.

हेला दूध देत नाही तर शिंग मारतो

मनोज जरांगे यांच्या मागण्या संविधानाला धरून नाही. त्यांची मागणी चूक आहे. जरांगेची मागणी म्हणजे हल्याचं दूध काढण्यासारखी गोष्ट नाही, हल्याकडून दुध नाही शिंग मिळेल हे जरांगेंनी समजुन घ्यावं असा सणसणीत टोला हाकेंनी मारला आहे. निजामाच्या गॅझेटमध्ये मराठे मागासवर्गीय कुठे आहेत. ओबीसींचं आरक्षण संपले आहे. सरकार जरांगेंचं ऐकत आहे. खटाखट कुणबी प्रमाणत्र वाटत आहे. जरांगेंच्या मागण्या संविधानानुसार कधीत मान्य होणार नाही. मराठे जर मागे राहीले तर मग पुढे कोण केले, असा सवाल त्यांनी विचारला. जेवढे प्रमाणपत्र दिलेत तेवढे खोटे आहे. कोणतेच प्रमाणत्र निकषात बसत नाहीत. जरांगें लढत आहेत. पण त्यांची मागणी चुकीची आहे, असा आरोप हाकेंनी केला आहे.

उपोषण करू नका, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे आवाहन

मनोजदादा जरांगे यांनी उपोषण करू नये असे आवाहन केले आहे. मनोज दादांनी उपोषण करु नये. तुमच्या 5 पिढ्यांचं नुकसान कशानमुळे झालं याचे कारण शोधावं. तुमच्या नुकसानीचे कारण ओबीसींचं आरक्षण नाही. ओबीसींचा एखादा मुलगा नगरसेवक झाला किंवा एखाद्या लोकल बॉडीवर गेला म्हणजे त्याच्याकडे मुख्यमंत्री किंवा प्रशासनासारखी निर्णय घेण्याची क्षमता नाहीये अशी प्रतिक्रिया हाकेंनी दिली आहे.

मी उपोषण करणार नाही, हाके उपोषण करणारा नाही. माझी जरांगेंनाही विनंती आहे बेकायदा मागणीसाठी उपोषण करू नका. आरक्षण हे गरिबीसाठी नाही. आरक्षण हे रिप्रेझेंटेशनसाठी आहे. जरांगेंना सर्वसामावेशक प्रश्नांवर आंदोलन करावं मी त्याच्या आंदोलनात सहभागी होणार, असे वक्तव्य सुद्धा हाकेंनी केले.

OBC च्या 18 महामंडळांना अजून अध्यक्ष मिळाला नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपये दिले. मराठा कोणी बुडवला याचा शोध घ्या. आजपर्य़ंत मराठ्यांना फसवले. जरांगें शेतकऱ्यांच्या, पाण्याच्या प्रश्नासाठी लढले तर मी त्याच्या आंदोलनात साथ देणार, पण ओबीसींच्या मागणीला मात्र माझा कायम विरोध असेल. OBC प्रणाणत्राचा फायदा राजकारण्यांना झाला. अंतरावाली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा. 8 वेळा याआधी उपोषण केलं आहे आता 9 वं उपोषण आहे. 5 पिढ्यांच नुकसान केलं अस त्याचं म्हणणं आहे मग फायदा झाला कुणाचा? असा सवाल त्यांनी मनोज जरांगे यांना केला.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय