AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxman Hake: ‘बेट्या, तू उन्हानं म्हातारा झालास’ लक्ष्मण हाके यांची या ओबीसी नेत्यावर जळजळीत प्रतिक्रिया, जरांगे यांच्यावर पुन्हा धरला निशाणा

Laxman Hake on Babanrao Taywade OBC Reservation: आज आम्ही पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना होणार आहोत. सरकारकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद नाही. दुसरीकडे जरांगेसाठी स्पेशल विमान खरेदी केले जाते त्याच्याकडे जाण्यासाठी हेलिपॅड बनवले जात आहे, अशी टीका प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली. यावेळी त्यांनी या बड्या ओबीसी नेत्यावर जळजळीत प्रतिक्रिया दिली.

Laxman Hake: 'बेट्या, तू उन्हानं म्हातारा झालास' लक्ष्मण हाके यांची या ओबीसी नेत्यावर जळजळीत प्रतिक्रिया, जरांगे यांच्यावर पुन्हा धरला निशाणा
लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 02, 2026 | 10:55 AM
Share

योगेश बोरसे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. आपण आज मुंबईसाठी रवाना होणार आहोत. सरकारकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद नाही. दुसरीकडे जरांगेसाठी स्पेशल विमान खरेदी केले जाते त्याच्याकडे जाण्यासाठी हेलिपॅड बनवले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. तर लक्ष्मण हाके आणि ओबीसी आंदोलकांची काल यवतमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी यवतमधील एका लॉन्समध्ये आंदोलकांची मुक्कामाची व्यवस्था केली होती. ओबीसी आंदोलक आज सकाळी पुन्हा यवतहुन मुंबईकडे रवाना होणार आहेत. लक्ष्मण हाके आज सकाळी पाटस टोल नाक्याहुन मुंबईकडे निघाले आहेत.

बबनराव तायवाडे कसले ओबीसी नेता?

दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यावर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी शा‍ब्दिक दारूगोळा टाकला. बबनराव तायवाडे कसला ओबीसी नेता आहे? त्यांनी कुठल्या ओबीसीसाठी आवाज उठवला आहे? अशी टीका त्यांनी केली. सरकार दरबारी ओबीसीचा आवाज पोहचत नाहीये. ओबीसी उपासमितीवर बहिष्कार घालणार नाही तर अजून काय करणार, ओबीसीसाठी 0.6 टक्के निधी फक्त दिला जात आहे. आज ओबीसी आरक्षण संपलं आहे, ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणात मराठे घुसले आहेत, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

‘बेट्या, तू उन्हानं म्हातारा झालास’

तायवाडे नावाचे गृहस्थ असं नेहमी म्हणतात की, आम्हाला मागण्या कळल्या नाहीत. बेट्या, तू उन्हानं म्हातारा झालास का असाच म्हातारा झाला? तुम्ही कसलं ओबीसीचं नेतृत्व करताय? अशी जळजळीत प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली. बबनराव तायवाडे यांनी नाभिक समाजाबद्दल, सुतारांबद्दल, लोहार, बेरड, रामोशी, बेलदारांसाठी त्यांनी कधी भूमिका घेतली का? त्यांनी एखादं आंदोलन केलं का? तुम्ही कसले ओबीसी? अशी तिखट प्रतिक्रिया हाके यांनी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यावर दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका

यावेळी हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. महिला अधिकाऱ्यांना तुम्ही शिव्या देतातात तुम्हाला कुणी अधिकार दिला. मराठ्यांना विचारतोय ह्या निजामाच्या आवलादीला तुम्ही नेता कसं बोलतात, असे हाके म्हणाले. तर आमदार, खासदार हे जरांगेंच्या भेटीला जात आहेत. तिथं हेलिपॅड तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंसाठी चॉपर विमान विकत घेतल्याचा आरोप हाके यांनी केला.

Follow Us
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?