पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु

पुण्यातील हडपसरमध्ये पहाटे बिबट्याचं दर्शन झालं. यावेळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर या बिबट्याने हल्ला केला. हडपसर येथील गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे ही घटना घडली. संभाजी आटोळे असं या तरुणाचं नाव आहे ज्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाला आहे.

पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु
Leopard
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 26, 2021 | 9:42 AM

पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये पहाटे बिबट्याचं दर्शन झालं. यावेळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर या बिबट्याने हल्ला केला. हडपसर येथील गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे ही घटना घडली. संभाजी आटोळे असं या तरुणाचं नाव आहे ज्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाला आहे.

संभाजी आटोळे हा गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉककरिता गेला होता. तेवढ्यात तिथे एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या पायाला आणि गालाला बिबट्याचे पंजे लागले. त्यात कतो जखमी झाला. सध्या संभाजी आटोळेंना ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु आहे.

इगतपुरी शहरभर बिबट्याचा वावर

इगतपुरीत शुक्रवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास मंगेश शिरोळे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून फरफटत नेले. मात्र, हा कुत्रा बिबट्याच्या तावडीतून रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी निघून आला. त्याची अवस्था अत्यंत खराब आहे, तर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सुधाकर यादव हे आपल्या शेतातील गोठ्यात म्हशींचे दूध काढून दारात आले असता समोर दारात बिबट्या दिसताच त्यांची पाचावर धारण बसली. त्यांनी हिम्मत करून हातातील बादली बिबट्याच्या दिशेने भिरकावली व जोरात ओरडायला सुरुवात केली. यामुळे बिबट्याने पळ काढला आणि ते थोडक्यात बचावले. दरम्यान, वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली आहे. नागरिकांनी येथे तात्काळ पिंजरा आणि ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

काळुस्तेमध्ये आईने मुलाला वाचवले

इगतपुरी तालुक्यातल्या काळुस्ते गावात मंगळवारी सकाळी सहा वाजता कार्तिक काळू घारे हा सहा वर्षांचा मुलगा आपल्या घरातील अंगणात झोका खेळत होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याला फरफटत नेले. कार्तिकची आई सीताबाई या त्यावेळी अंगणातच भांडे घासत होत्या. त्यांनी जीवाचा थरकाप उडवणारे हे दृष्य पाहिले. धावा, धावा अशा हाका मारत हातात काठी घेऊन बिबट्याचा पाठलाग केला आणि थेट त्याच्यावर चित्त्यासारखी झडप घातली. तेव्हा घराशेजारी असणाऱ्या खड्ड्यात बिबट्या पडला. नेमकी हीच संधी साधत त्यांनी कार्तिकला बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले.

संबंधित बातम्या :

शहरभर बिबट्याचा वावर; इगतपुरीकरांची पाचावर धारण

Video: बिबट्याचा घोरपडीवर लपून हल्ला, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

Follow Us