Video: बिबट्याचा घोरपडीवर लपून हल्ला, शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

10 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये, एक घोरपड कोरड्या गवताच्या शेतात शांत बसलेली दिसत आहे. दुसऱ्या बाजूला एक बिबट्या घात लावून बसलेला आहे.

Video: बिबट्याचा घोरपडीवर लपून हल्ला, शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
घोरपडीवर बिबट्याचा हल्ला


मृत्यूवर कुणाचाही जोर चालत नाही, ज्याची वेळ येते, त्याला जावंच लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल की, मृत्यूला चुकवता येत नाही. एक बिबट्या शेतात सुप्तावस्थेत पडलेल्या घोरपडीवर हल्ला करतो आणि घोरपडीला आपलं शिकार बनवतो. (Leopard attack on monitor lizard videos goes viral on social media )

10 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये, एक घोरपड कोरड्या गवताच्या शेतात शांत बसलेली दिसत आहे. दुसऱ्या बाजूला एक बिबट्या घात लावून बसलेला आहे. त्याचवेळी, बिबट्या हळूहळू घोरपडीकडे चालत येतो. तेवढ्यात तो जोरात हल्ला करतो, आणि तिला पळायच्या आत तो तिला तोंडात पडतो.

व्हिडीओ पाहा:

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेताच्या गवतात लपलेला बिबट्या अजिबात दिसत नाही. गवताचा रंग आणि बिबट्याची त्वचा जवळपास सारखीच दिसते. हेच कारण आहे की, मॉनिटर लिझार्डच्या मुलाच्या अगदी जवळ गेल्यानंतरही बिबट्या त्याला पाहू शकला नाही. काही सेकंदांनंतर, बिबट्याने त्याच्या मजबूत जबड्याने त्याची मान पकडली. बिबट्या इतक्या वेगाने हल्ला करतो की घोरपड लढू शकली नाही.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ फेसबुकवर The Adventures नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सना खूप आवडत आहे. फेसबुकवर अपलोड केल्यापासून हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाख 73 हजार वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सतत वाढत आहे.

हेही पाहा:

Video: मांजरीच्या शेपटीला पकडण्याचा प्रयत्न करणारा पोपट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Video: सपाट भिंतीवर मांजर भराभर चढली, लोक म्हणाले, “ही मांजर नाही, ही स्पायडरमॅन आहे!”

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI