Video: सपाट भिंतीवर मांजर भराभर चढली, लोक म्हणाले, “ही मांजर नाही, ही स्पायडरमॅन आहे!”

सपाट भिंतीवर चढणे ही सोपी गोष्ट नाही, कुठलंही मांजर असं करु शकत नाही, पण या मांजराला ते चांगलं जमतं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे, जो लोकांना आवडतानाही दिसतो आहे.

Video: सपाट भिंतीवर मांजर भराभर चढली, लोक म्हणाले, "ही मांजर नाही, ही स्पायडरमॅन आहे!"
एक मांजर धावत येते आणि भिंतीवर चढते.

आपण सर्वांनी इंटरनेटवर बरेच व्हिडिओ पाहिले असतील. काही मजेदार असतात तर काही आश्चर्यकारक आहेत. तुम्ही बऱ्याचदा मांजरी झाडांवर चढताना, धावताना किंवा भांडताना पाहिल्या असतील, पण आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक मांजर झाडावर नाही तर चक्क घरातल्या भिंतीवर चढताना दिसत आहे. सपाट भिंतीवर चढणे ही सोपी गोष्ट नाही, कुठलंही मांजर असं करु शकत नाही, पण या मांजराला ते चांगलं जमतं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे, जो लोकांना आवडतानाही दिसतो आहे. (Cat climbs a wall with unbelievable swiftness watch viral video on instagram)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर baklolshekhar नावाच्या अकाऊंवरुन पोस्ट करण्यात आला आहे., हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘वाह काय कला आहे.’ हा व्हिडिओ तुम्ही इतर सोशल मीडिया पेजवरही पाहू शकता. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक मांजर धावत येते आणि भिंतीवर चढते. खरं पाहायला गेलं तर, ही मांजर लेसर प्रकाशाचा पाठलाग करत आहे. जो मालक भिंतीवर मारत आहे, लेसर लाईट जिथे जाईल तिथे तिथे ही मांजरही धावते.

पाहा व्हिडीओ:

जर लेसर लाइट थांबला तर ती मांजर भिंतीवरही थांबते. मांजरींना काहीही पकडायला खूप मजा येते, हलणाऱ्या गोष्टी, पळणाऱ्या गोष्टी वा लेसर लाईट्स मांजरींना खूप आकर्षण असतं. मांजर हा सर्वाधिक जिज्ञासू प्राण्यांपैकी एक आहे, घरात आलेली प्रत्येक नवीन गोष्ट काय आहे, हे मांजरींना जाणून घ्यायचं असतं. त्यातूनच त्या अशा वागतात.

व्हिडिओवर कमेंट करताना, एका युजरने लिहिले की, ‘ही मांजर स्पायडरमॅन आहे’ काही लोक आहेत जे मांजरीचा हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत , काही मजा घेताना तर काही आश्चर्यव्यक्त करताना दिसत आहे.काहींना हीही शंका आहे की, या भिंतीवर मेट्रेसचं आवरण असू शकतं. हा व्हिडीओ REDDIT या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही खूप व्हायरल होत आहे.

हेही पाहा:

Video: शेअरिंग इज केअरिंग, मांजरींचा व्हिडीओ तुफान व्हायरल, लोक म्हणाले, हे माणूस कधी शिकणार?

Video: पाणी पिणाऱ्या सिंहाची कासवाने छेड काढली, त्यानंतर जे झालं, ते पाहून नेटकरी आवाक!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI