MPSC exam schedule| महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर ; पाहा एका क्लिकवर

| Updated on: Jan 03, 2022 | 3:57 PM

एमपीएससीच्या पोलीस निरीक्षक पदासाठी येत्या 29 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र याच दिवशी आता म्हाडाची लांबवण्यात आलेली परीक्षादेखील घेतली जाईल. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत. यामुळे आता राज्यातील विद्यार्थी गोंधळात पडला आहे

MPSC exam schedule| महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर ; पाहा एका क्लिकवर
एमपीएससीची मोठी भरती
Image Credit source: mpsc website
Follow us on

पुणे – कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारास परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं परिक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. त्यामध्ये आयोगाने 2 जानेवारी 2022 ला होणारी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा  पुढे ढकली होती. त्यानंतर वयोमर्यादा उलटून गेलले विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. आता पुन्हा आयोगाने पुन्हा एकदा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे.  असे आहे सुधारित वेळापत्रक

परीक्षा –

राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021

यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 1 जानेवारी 2022

सुधारित तारीख -23 जानेवारी 2022

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा , संयुक्त पेपर क्र 1

यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 22 जानेवारी 2022 ,

सुधारित तारीख – 29 जानेवारी 2022 .

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा2020, पेपर क्र -2 पोलिस उपनिरीक्षक

यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 29 जानेवारी 2022

सुधारित तारीख – 30 जानेवारी 2022

या प्रकारे या तीन या परीक्षांचे सुधारित वेळापत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांची कोंडी म्हाडा व एमपीएससीच्या परीक्षाच्या तारखा एकच

एमपीएससीच्या पोलीस निरीक्षक पदासाठी येत्या 29 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र याच दिवशी आता म्हाडाची लांबवण्यात आलेली परीक्षादेखील घेतली जाईल. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत. यामुळे आता राज्यातील विद्यार्थी गोंधळात पडला आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्यामुळे तारखा जाहीर करताना इतर विभागाचं वेळापत्रक लक्षात घेतलं जातं नाही, असा आरोप केला जातोय. राज्यभरात 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान म्हाडाची परीक्षा होत आहे. पेपर फुटल्याचे आरोप झाल्यामुळे म्हाडाची 12 ते 20 डिसेंबर 2021 दरम्यान होणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती.

मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, किती तारखेपर्यंत बंद राहणार शाळा? वाचा सविस्तर

NCB | उभ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची अखेर बदली

MHADA Exam | स्पर्धा परीक्षांचा गोंधळ मिटता मिटेना ! म्हाडा आणि एमपीएससीची एकाच दिवशी परीक्षा