ओळखीच्या तरुणाकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार

| Updated on: Jan 17, 2023 | 1:56 PM

काही दिवसांपूर्वी त्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यावेळी मुलीच्या आईने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करुन घेतल्या. त्यात ती २८ आठवड्यांची गर्भवती असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं.

ओळखीच्या तरुणाकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार
9 बालिकेवर अत्याचार करत हत्या
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : महिला सुरक्षेसंदर्भात मागील सरकारने विधानसभेत शक्ती विधेयक (shakti videyak) मंजूर केले होते. बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा आणि ऑसिड हल्लेखोरांना १५ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा या कायद्यात करण्यात आली आहे. म्हणजेच महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे कठोर केले गेले आहे. परंतु त्यानंतरही महिलांवर अत्याचाराच्या (rapc cases) घटना कमी होत नाही. अगदी ओळखीच्या लोकांकडूनही अत्याचार होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. पुणे सांस्कृतिक शहर, शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या अत्याचारात घटना पुणे शहर व परिसरात वाढत आहे. एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार केल्याच्या घटनेनंतर पुणे शहर हादरले आहे.

पुणे येथील वानवाडी भागात १९ वर्षीय तरुण व १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेजारी शेजारी राहते. तरुणाने त्या मुलीला खेळण्याच्या बाहण्याने बोलवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. “माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आपण लग्न करू” असे सांगत त्या तरुणाने अनेक वेळा अत्याचार केला.

हे सुद्धा वाचा

अशी उघड झाली घटना
तरुण व अल्पवयीन मुलीसंदर्भात हा सगळा प्रकार किमान सहा महिने सुरु होता. काही दिवसांपूर्वी त्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यावेळी मुलीच्या आईने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करुन घेतल्या. त्यात ती २८ आठवड्यांची गर्भवती असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं. हे ऐकून मुलीच्या आईला धक्का बसला. तिने मुलीकडे विचारणा केली असता प्रकार उघड झाला. आता या घटनेसंबधी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार जानेवारी ते जून २०२२ दरम्यान घडला असल्याचे समोर आले आहे.

मागील आठवड्यात आजोबाच्या नातीसंदर्भातील प्रकार उघड
६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. पीडित मुलगी ४ थी मध्ये शिकत आहे. तिच्या शाळेत शाळेतील बॅड टच आणि गुड टच म्हणजेच समुपदेशनाचा कार्यक्रम सुरु होता.त्यावेळी सगळ्या विद्यार्थीनी आपआपले प्रसंग सांगत होत्या. एका मुलीने तिचे सख्ये आजोबा तिच्यासोबत कसे घाणरडे वर्तन करत होते, ते सांगितले. यावेळी शिक्षिकेलाही हादरा बसला. त्या मुलीने डिसेंबर महिन्यात तिच्या बरोबर घडलेला प्रकार सांगितला. “जेव्हा कोणी घरात नसते तेव्हा आजोबा गोदीत बसवत आणि…” असे सांगत या चिमुरडीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली.आजोबा आधी अश्लील व्हिडिओ दाखवत होते. त्यावेळी मी ओरडले तर ते माझे तोंड दाबून मला गप्प करायचे.