AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांसाठी काहीतरी हेल्दी बनवायचंय? बेसन आणि ओट्सपासून बनवा टेस्टी कुकीज, पाहा सोपी रेसिपी

Healthy Recipe for Kids: बहुतांश मुलांना बिस्कीट, कुकीज खायला आवडतात. पण जर तुम्हाला त्यांना मैदा आणि साखरेपासून बनवलेल्या कुकीज खायला द्यायच्या नसतील तर तुम्ही बेसन आणि ओट्सपासून टेस्टी कुकीज बनवू शकता. ही सोपी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.

मुलांसाठी काहीतरी हेल्दी बनवायचंय? बेसन आणि ओट्सपासून बनवा टेस्टी कुकीज, पाहा सोपी रेसिपी
टेस्टी कुकीज रेसीपी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 29, 2026 | 10:12 PM
Share

अगदी लहान मुलांना सुद्धा बिस्कीट, कुकीज खायला आवडतात. पण मैदा आणि साखर घालून बनवलेल्या कुकीज बहुतेकदा आरोग्यासाठी हानिकारक असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ते खाणे टाळावे असे म्हटले जाते. पण आता तुम्ही बेसन आणि ओट्स घालून टेस्टी आणि हेल्दी कुकीज बनवू शकता. मुलांना त्याची चव आवडेल आणि ते मैद्याच्या कुकीजसारखे अनहेल्दी देखील नाही. बेसन आणि ओट्सपासून कुकीज बनवणे सोपे आहे. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून ओट्स आणि बेसनपासून हेल्दी कुकीजची रेसिपी.

बेसन आणि ओट्सची कुकीज बनवण्यासाठी साहित्य

– अर्धा कप बेसन – एक कप ओट्स – १५-२० मनुके – एक बार डार्क चॉकलेट – दोन चमचे दूध – अर्धा कप ब्राऊन शुगर किंवा गूळ पावडर – ५० ग्रॅम अनसॉल्टेड बटर – अर्धा चमचा बेकिंग पावडर – अर्धा चमचा बेकिंग सोडा – मीठ चिमूटभर

बेसन आणि ओट्सपासून कुकीज बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एका खोल भांड्यात ब्राऊन शुगर किंवा गूळ पावडर घ्या. त्यात ठराविक प्रमाणात अनसॉल्टेड बटर घाला. आता हे चांगले फेटून घ्या. फेटल्यानंतर त्यात बेसन, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ हे नीट गाळून टाका. आता या सर्व गोष्टी नीट मिक्स करून घ्या. वरुन मनुका घाला. तसेच डार्क चॉकलेटचे छोटे तुकडे करून टाका. एक कप ओट्स मिक्स करा. त्यात दोन चमचे दूध घालून हाताने मिक्स करून पीठ सारखे मळून घ्या. लक्षात ठेवा की ते खूप गुळगुळीत करण्याची गरज नाही. सर्व साहित्य नीट एकत्र बांधले जात नाही तोपर्यंत मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणाला लहान बिस्किटांचा आकार द्या. मायक्रोवेव्ह १८० अंशांवर सेट करा. आता एका प्लेटमध्ये बटर पेपर ठेवून त्यावर तयार कुकीज ठेवा. १५ ते २० मिनिटांत कुकीज तयार होतील. मुलांना टेस्टी आणि हेल्दी कुकीज खायला द्या.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं