AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Thackeray: ड्रग्स थांबवण्याची सरकारमध्ये ताकद नाही का? अमित ठाकरेंचा जळजळीत सवाल, म्हणाले पोलिसांना फक्त…

MNS Leader Amit Thackeray Big Statement: मुंबईतील ड्रग्स प्रकरण आणि नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतराप्रकरणावरून तसेच राज्यातील इतर प्रश्नांवरून मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मोठा संताप व्यक्त केला.

Amit Thackeray: ड्रग्स थांबवण्याची सरकारमध्ये ताकद नाही का? अमित ठाकरेंचा जळजळीत सवाल, म्हणाले पोलिसांना फक्त...
मनसे नेते अमित ठाकरेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 11:50 AM
Share

MNS Leader Amit Thackeray Big Statement: मुंबईतील ड्रग्स प्रकरणासह नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर, लैंगिक छळावरून अमित ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. अमित ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी मोठा संताप व्यक्त केला. तर आपण जर सत्तेत असतो तर अशा लोकांना अगोदर फासावर चढवले असते असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना २४ तासांसाठी मोकळी दिल्यास सर्व गुन्हेगार नीट होतील असे भाष्य केले. आज पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संघटनेत बदलाचे वारे

राज ठाकरेंनी सगळीकडे संपर्क अध्यक्ष नेमले आहेत. आम्ही सगळ्यांना वन टू वन भेटणार आहोत. सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत आम्ही कुठ कमी पडतोय. संघटनेत काही बदल झाले पाहिजेत. सगळा सविस्तर अहवाल तयार करून राज ठाकरे यांना देणार आहोत.25 आणि 26 एप्रिल रोजी ग्रामीण भागात जाणार आहोत. इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांना देखील भेटणार आहोत, असे अमित ठाकरे म्हणाले.

गोरेगाव ड्रग्स प्रकरणावरून संताप

हे सगळं दुर्देवी आहे. राज्यात आणि शहरात ड्रग्स येतात कुठून, असा सवाल त्यांनी विचारला. सगळ्या शहरात ड्रग्स सापडत आहेत, विकले जात आहेत. हे थांबवण्याची ताकद सरकार मध्ये नाहीये का , असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला. पोलिसांना फ्री HAND द्या. आपल्या शहरांना कुठे आणून ठेवलं आहे. ड्रग्स मोठ्या प्रमाणात येतात हे भीषण आहे. याचे आकडे सरकारकडे नाहीयेत का. अशी अनेक आरोपी आहेत जे ड्रग्स विकतात. शाळेच्या बाजूला ड्रग्स विकले जात आहेत. कठोर कारवाई झाली पाहिजे. सगळ्यात घाणेरडी शिक्षा द्या. राज्यात ड्रग्स येतात त्यावर सरकारने काम करावे, असे अमित ठाकरे म्हणाले.

आम्ही रस्त्यावर उतरून काय करू. प्रशासनाने ही गोष्ट हातात घेतली पाहिजे. आम्ही तर रस्त्यावर उतरूच. कारवाई झाली पाहिजे. आपण PORCHE कार प्रकरण विसरलो. सरकारला विचारलं पाहिजे की ड्रग्स येतात कुठून? एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स येतात कुठून? हे प्रश्न विचारले पाहिजे. 100 टक्के सगळ्या कंपनींचे ऑडिट झाले पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या कंपन्यांत कोण काम करता. ऑडिट झालं पाहिजेच, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

तर आरोपींना फाशी दिली असती

मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती. एक उदाहरण सेट करा. तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड द्यावा. महाराष्ट्र राज ठाकरेंच्या हातात द्या महाराष्ट्र राज ठाकरेच साफ करू शकतात. आणि त्यांनी सांगावं की आरोपींना माझ्यासमोर उभे करा. आता पोलिसांना फ्री हँड आहे का? असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...