पुण्यात जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस, मोबाईल टॉवर कोसळला

| Updated on: Dec 08, 2020 | 9:49 AM

पुण्यात कोरोनाने थैमान घातलं असताना आज (1 मे) वादळी वाऱ्यासह (Mobile tower collapsed in Pune) मुसळधार पाऊस पडला.

पुण्यात जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस, मोबाईल टॉवर कोसळला
Follow us on

पुणे : पुण्यात कोरोनाने थैमान घातलं असताना आज (1 मे) वादळी वाऱ्यासह (Mobile tower collapsed in Pune) मुसळधार पाऊस पडला. या पावसादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने शिवाजीनगर येथील संचेती रुग्णालयाजवळ मोबाईल टॉवर कोसळला. लॉकडाऊनमुळे या परिसरात वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही (Mobile tower collapsed in Pune).

दरम्यान, पुणे महापालिकेला याबाबत माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने टॉवरचा सांगडा हटवण्याचं काम सुरु केलं. याबाबत पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: माहिती दिली आहे.

“पुणे शहरात आज दुपारी झालेल्या पावसादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने मंगळवार पेठ परिसरात मोबाईल टॉवर कोसळला आहे. या संदर्भातील माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे समजत आहे”, अशी माहिती महापौरांनी दिली.

राज्यात सध्या जवळपास सर्वच शहरांमधील उन्हाचा पारा 35 ते 40 अंशावर पोहचला आहे. मात्र, 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुण्यातही वादळ, वारा, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर आज पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.

संबंधित बातम्या :

Lockdown 3 | देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला