Monsoon Update : आयएमडीने दिला मान्सूनचा चार आठवड्याचा अंदाज, राज्यात कधीपासून बरसणार

Monsoon Update : कोकणात नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली होती. परंतु अजून पाऊस सक्रीय झालेला नाही. कोकणातून संपूर्ण राज्यात पाऊस पोहचला नाही. त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Monsoon Update : आयएमडीने दिला मान्सूनचा चार आठवड्याचा अंदाज, राज्यात कधीपासून बरसणार
| Updated on: Jun 16, 2023 | 1:22 PM

पुणे : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. शुक्रवारी दुपारनंतर ते कमकुवतही झाले. परंतु शेतकरी ज्याची वाट पाहत आहे, तो मान्सून अजूनही कोकणानंतर राज्यात सक्रीय झालेला नाही. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने आता चार आठवड्याचा अंदाजी जारी केला आहे.

का झाला मान्सूनला उशीर

अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीला विलंब झाला आहे. नैऋत्य मान्सून भारतात ४ जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. त्यानंतर देशभरात त्याची वाटचाल सुरु होते. परंतु नैऋत्य मान्सूनला पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असली तरी त्याला काही काळ लागणार आहे. आणखीन एका आठवड्याने पावसाचे आगमन होईल.

आता कधीपासून सक्रीय होणार मान्सून

राज्यात आणि देशात मान्सून रखडलाय आहे. पावसासाठी एक आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे. मान्सूनची रेषा दक्षिण कोकणाच्या पुढे अजूनही सरकलेली नाही. मान्सूनचा प्रवास २३ जूनपासून सुरळीत होऊ शकेल, असा भारतीय अंदाज हवामान हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अंदाजानुसार २२ जूनपर्यंत पावसाची शक्यता ऋण श्रेणीमध्ये आहे. त्यामुळे आता आणखी एक आठवडा पावसाची वाट पाहावी लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी १८ ते २१ जूनदरम्यान अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यानंतर २३ जूनपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.

पुणे शहरात पावसाचा अंदाज

पुणे शहरासह उपनगरांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे शहरात आज हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यात आज मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. शहरात ढगाळ वातावरण असल्यामुळे गारवा वाढला आहे.

नागपुरात पावसाची प्रतिक्षा

जूनचा पंधरवाडा लोटला तरिही नागपूरसह विदर्भात पावसाचा पत्ता नाही. उलट नागपूरात उकाडा वाढल्याने दिवसभर घामाच्या धारा वाहतात. तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी जास्त आहे. त्यामुळे तापमान वाढल्याने महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचा उन्हाचा त्रास होऊ लागलाय. हा त्रास कमी व्हावा म्हणून जूनच्या पंधरवाड्यानंतरंही महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील बिबट्या आणि वाघांसाठी कुलर्स सुरु आहेत. शिवाय बिबट्यांच्या पिंजऱ्यात गारवा रहावा म्हणून दिवसांतून तीन ते चार वेळा पाणी शिंपडलं जातंय. सध्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात चार बिबटे आणि दोन वाघ आहे. या वाघ आणि बिबट्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जातेय.

हे ही वाचा

Monsoon Update : ‘स्कायमेट’ने दिली चिंता वाढवणारी बातमी, मान्सूनबाबत महत्वाचे अपडेट