AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kavya Maran : पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावणं काव्या मारनला पडलं महागात ! सनरायजर्सला बसला मोठा झटका

द हंड्रेडसाठी लिलावात काव्या मारनची नवीन फ्रँचायझी, सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला विकत घेतल्याने वाद निर्माण झाला होता. भारतीय मालकीच्या चार फ्रँचायझींपैकी, सनरायझर्सनेच एका पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतलं होतं. त्यामुळे मोठी टीका झाली.

Kavya Maran : पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावणं काव्या मारनला पडलं महागात ! सनरायजर्सला बसला मोठा झटका
काव्या मारन
| Updated on: Mar 13, 2026 | 10:11 AM
Share

IPL 2026 चा सीझन सुरू होण्यापूर्वीच सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारन मोठ्या वादात सापडली आहे. इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीग मध्ये सनरायजर्स ग्रुपच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतलं, ज्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला. ‘द हंड्रेड’ मध्ये पहिल्यांदाच लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सनरायझर्स लीड्सने मोठी रक्कम देऊन पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला विकत घेतलं होतं. तेव्हापासून काव्या मारनवर जोरदार टीका करण्यात येत आहे. हे सगळं कमी की काय म्हणून आता सनरायजर्स लीडचं सोशल मीडिया अकाऊंट अचानक बंद करण्यात आल्याने सगळेच हैराण झालेत.

का n, म्हणजेच 12 मार्त, गुरुवारी द हंड्रेड मेन्स टूर्नामेंटसाठी इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव झाला. त्यामध्ये सनरायझर्स लीड्सने तब्बल पाकिस्तानी लेग-स्पिनर अबरार अहमदला 1,90,000 पौंड म्हणजेच अंदाजे 2.3 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम देऊन विकत घेतलं. यावेळी तिच्या फ्रँचायझीसह काव्या मारन देखील लिलावाच्या टेबलावर उपस्थित होती, पण सनरायजर्स संघाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली, टीकाही झाली आणि गोंधळ माजला.

अकाऊंट सस्पेंड ?

या निर्णयापासूनच काव्या मारन आणि तिच्या फ्रँचायजीवर जोरदार टीका होताना दिसत असून लोका त्यांना सुनावत आहेत. हा वाद कमी की काय म्हणून आता या फ्रँचायझीचं सोशल मीडिया अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आलं आहे. लिलावात अबरारच्या खरेदीवरून वाद निर्माण झाल्यानंतर काही तासांतच, सनरायझर्स लीड्सचे ‘X’ अकाउंट निलंबित करण्यात आले. X च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अकाऊंट निलंबित करण्यात आलं आहे, असं फ्रँचायझीच्या अकाऊंटवर नमूद करण्यात आलं आहे. मात्र नेमक्या कोणत्या नियमाचे उल्लंघन झालं आणि अकाऊंट का सस्पेंड केलं हे मात्र अद्याप स्पष्ट झालेल नाही.

पाकिस्तानी खेळाडूंवर नजर

ऑक्शनबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धेतील चार भारतीय मालकीचे संघ पाकिस्तानी खेळाडू खरेदी करतील का याकडे सर्वांचे लक्ष होते. आयपीएलमधील चार भारतीय मालकीचे संघ पाकिस्तानी खेळाडू खरेदी करणार नाहीत असा दावा एका वृत्तात करण्यात आला होता., त्यानंतरच असा सवाल निर्माण झाला होता. यानंतर, ईसीबीने सर्व फ्रँचायझींशी सल्लामसलत करून एक निवेदन जारी केलं. खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या आधारावर नव्हे तर त्यांच्या प्रतिभेच्या आधारावर खरेदी करण्यात येईल, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. या लिलावात 13 पाकिस्तानी खेळाडू सहभागी झाले असले तरी, अबरार व्यतिरिक्त फक्त फिरकी गोलंदाज उस्मान तारिकला खरेदी करण्यात आलं. त्याला बर्मिंगहॅम फिनिक्सने विकत घेतलं.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली