
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर पुन्हा आज वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवार, रविवार अन् सुट्टीच्या दिवशी महामार्गावरील वाहतूक कोंडी हा नेहमीचा प्रकार झाला आहे. देशातील पहिल्या दहा एक्स्प्रेस वे मध्ये असणाऱ्या मार्गावर सर्वाधिक टोल आकारला जात आहे. त्यानंतरही वाहन धारकांना सुट्टीच्या दिवशी सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. शनिवारी अन् रविवारी सुट्यांमुळे दोन्ही शहरात जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. दोन दिवसांच्या सुट्टीमुळे चाकरमाने गावी निघाल्यामुळे एकाच वेळी अनेक गाड्या महामार्गावर आल्या आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग २००२ मध्ये सुरु झाला. या महामार्गामुळे पुणे आणि मुंबई दरम्यानचे अंतर कमी झाले. दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक वेगवान झाला. २००२ नंतर आता २०२४ मध्ये या महामार्गावर वाहनांची संख्या अनेक पटीने वाढली आहे. यामुळे हा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहतुकीची ही कोंडी फोडण्यासाठी या मार्गावर आणखी लेनचा प्रस्ताव तयार केला गेला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तो मंजूर झाल्यावर वाहतूक कोडींतून सुटका मिळणार आहे.
Pune-Mumbai Expressway
मुंबई पुणेसाठी एक्स्प्रेस-वे जेव्हा २००२ मध्ये तयार केला गेला, त्यावेळी भविष्याचा विचार केला गेला होता. मार्ग तयार करताना त्यावरुन रोज ४० हजार वाहने जातील, असा आराखडा तयार केला गेला होता. परंतु आता २५ वर्षांनंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या महामार्गावरुन जाणारी वाहने वाढली आहेत. आता रोज ६० हजार वाहने पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वरुन जात आहेत. विकेंड आणि सुट्या असणाऱ्या दिवशी वाहनांची संख्या ८० ते ९० हजारांवर जातो. ४० हजार क्षमतेचा मार्गावर दुप्पट वाहने जात असल्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होते.
traffic jam on mumbai-pune expressway today#Expressway pic.twitter.com/4zCtE6w59D
— jitendra (@jitendrazavar) April 20, 2024