AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कधी विराजमान होणार? अजित पवार बघा काय म्हणाले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून सातत्याने अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करुन बॅनरबाजी केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या या बॅनरबाजीला खरंच काही अर्थ आहे का? असा प्रश्न आज अजित पवार यांना विचारण्यात आला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कधी विराजमान होणार? अजित पवार बघा काय म्हणाले
| Updated on: Aug 01, 2023 | 11:28 PM
Share

पुणे | 1 ऑगस्ट 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याचा दौरा आटोपून मुंबईच्या दिशेला रवाना झाले. त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून झळकावले जाणारे बॅनर्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी आपलं मत मांडलं. विशेष म्हणजे अजित पवार यांना यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कधी विराजमान होणार? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

“मुख्यमंत्रीपदाबाबत स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी नेमकं काय ठरलं आहे ते मीडियाला सांगितलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. तर आम्ही दोघे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी म्हणून काम करतोय. त्यामुळे आम्हाला मिळालेली जबाबदारी तर नीट पार पाडू द्या”, असं अजित पवार म्हणाले.

“कार्यकर्त्यांचं समाधान होण्याकरता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले असावेत. नाहीतर त्यांनी पोश्टर लावून समाधान मानावं. त्यांना समाधान मिळालं, ठिक आहे”, असं अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. “तुम्ही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये काम केलं. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात काय फरक वाटतो?” असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला.

“प्रत्येकाचं काम आपापल्या परीने वेगळं आहे. आता तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारता, दुसरे विचारता, प्रत्येकाची विचारण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे आपण ज्यांच्याबरोबर काम करतो तिथे विश्वासाने काम करायचं अशी माझी पद्धत आहे. त्यापद्धतीने मी उद्धव ठाकरे यांच्याही बरोबर काम केलं. तसेच आता एक महिना होईल, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतोय. त्यांच्याबरोबरही तेवढ्याच विश्वासाने काम करतोय”, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?

“अधिवेशनच्यानंतर विस्तार होण्याची शक्यता आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पण शेवटी हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात तसं काही असेल तर ते करतील”, असं उत्तर अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर दिलं.

यावेळी आणखी एका पत्रकाराने दादा मुख्यमंत्री कधी होणार असा प्रश्न विचारला, त्यावर अजित पवार यांनी मश्किलपणे उत्तर दिले. “अरे बाबा आता चाललंय ते सरकार चालू दे ना बाबा, काय ते नवीन, आता जाऊद्या, सहा वाजता विमान आहे”, असं अजित पवार म्हणाले.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.