NCP Rupali Patil : बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी; राज ठाकरेंनाही केला सवाल, म्हणाल्या…

बहीण म्हणून मी वसंत मोरेंच्या पाठीशी आहे. त्यांनी जी भूमिका घेतली, ती योग्यच आहे, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, अशी पाठराखण राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली आहे. यानिमित्ताने त्यांनी वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना अप्रत्यक्ष निमंत्रणच दिले आहे.

NCP Rupali Patil : बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी; राज ठाकरेंनाही केला सवाल, म्हणाल्या...
रुपाली पाटलांचा खोचक सवाल
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 2:28 PM

पुणे : बहीण म्हणून मी वसंत मोरे (Vasant More) यांच्या पाठीशी आहे. त्यांनी जी भूमिका घेतली, ती योग्यच आहे, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, अशी पाठराखण राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी केली आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना अप्रत्यक्ष निमंत्रणच दिले आहे. त्या म्हणाल्या, की राज ठाकरेंची सभा ही भाजपाची होती. राज ठाकरेंनी यू-टर्न घेतला आहे. असे होईल हे कोणालाही वाटले नव्हते. राज ठाकरे म्हणाले, की शरद पवारांमुळे जातीवाद वाढला. तर मग हसन मुश्नीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे मंत्री असते का, असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना केला आहे. राज ठाकरेंना भाजपाने बोलायला लावले. भाजपाने हे घडवून आणले आहे, अशी टीका रुपाली पाटील यांनी केली आहे.

मुस्लीम कार्यकर्त्यांची घेतली होती भेट

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर नाराज झालेल्या मनसेच्या काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले. यावर वसंत मोरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी या कार्यकर्त्यांची भेटही घेतली. फेसबुक पोस्टही केली. एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही, त्यांच्या या वाक्याचे वेगवेगळे संदर्भ घेतले जात आहेत. हा अप्रत्यक्ष इशाराही मानला जातोय.

वाढतोय पक्षांतर्गत विरोध

प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी जाहीररित्या वसंत मोरेंच्या भूमिकेला विरोध केला. मोरे यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे. त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही, असे म्हणत त्यांना एकप्रकारे डिवचले आहे. म्हणजे शहरात मनसे कार्यकर्त्यांमध्ये सरळसरळ दोन गट पडले आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीने तर अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवत आमंत्रणच दिले आहे.

आणखी वाचा :

MNS Vasant More : किती जणांनी शहरात स्पीकर लावले? राज ठाकरेंच्या घोषणेवर वसंत मोरेंचा सवाल, पक्षांतर्गत विरोधकांनाही सुनावलं

MNS Vasant More : मनसेचा पुण्यातला ‘किल्ला’ ढासळणार? वसंत मोरे मुस्लीम कार्यकर्त्यांच्या भेटीला, राजसाहेब बघताय ना?

Video : एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार तीनवेळा झाली पलटी; लोणावळ्यातला थरार CCTVत कैद