AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS Vasant More : राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करतायत? राज ठाकरेंचे भोंगे लावायला विरोध ते आज मुस्लीम कार्यकर्त्यांची भेट, चर्चा तर होणारच

मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) सध्या चर्चेत आहेत, ते त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे. त्यांच्या भूमिकेचे एकीकडे स्वागत होत असले तरी पक्षांतर्गत मात्र विरोध होताना दिसत आहे. त्यांच्या भूमिकेनंतर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

MNS Vasant More : राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करतायत? राज ठाकरेंचे भोंगे लावायला विरोध ते आज मुस्लीम कार्यकर्त्यांची भेट, चर्चा तर होणारच
वसंत मोरे, शहराध्यक्ष, मनसेImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 06, 2022 | 1:35 PM
Share

पुणे : मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) सध्या चर्चेत आहेत, ते त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे. मशिदींवरचे भोंगे काढले नाही, तर त्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार, अशी वादग्रस्त भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आणि त्यांनी काही ठिकाणी असे हनुमान चालिसा स्पीकर लावण्याचे प्रकारही केले. दुसरीकडे शहराध्यक्ष असलेले वसंत मोरे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. मी माझ्या प्रभागात अशाप्रकारचे स्पीकर लावणार नाही, ही ठाम आणि सर्वसमावेशक भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेचे एकीकडे स्वागत होत असले तरी पक्षांतर्गत मात्र विरोध होताना दिसत आहे. त्यांच्या भूमिकेनंतर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

भोंग्यांवर काय म्हणाले वसंत मोरे?

मी पक्षाची नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली आहे. मी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत आहे. राज ठाकरे यांच्याशी आपले बोलणे झालेले नाही. त्यांनी बोलावले तर भूमिका त्यांना समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचे आहे, असेही ते म्हणाले होते. तर त्यामुळे आलेल्यांनी मला सांगू नये, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पिकर लावले? जे बोलतायेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका त्यांनी पक्षाच्याच सहकाऱ्यांवर विशेषत: प्रदेश सरचिटणीस असलेले हेमंत संभूस यांच्यावर केली.

मुस्लीम कार्यकर्त्यांची घेतली भेट

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर नाराज झालेल्या मनसेच्या काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले. यावर वसंत मोरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी या कार्यकर्त्यांची भेटही घेतली. फेसबुक पोस्टही केली. एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही, त्यांच्या या वाक्याचे वेगवेगळे संदर्भ घेतले जात आहेत. हा अप्रत्यक्ष इशाराही मानला जातोय.

पक्षांतर्गत गटबाजी, वाद चव्हाट्यावर

प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी जाहीररित्या वसंत मोरेंच्या भूमिकेला विरोध केला. मोरे यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे. त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही, असे म्हणत त्यांना एकप्रकारे डिवचले आहे. म्हणजे शहरात मनसे कार्यकर्त्यांमध्ये सरळसरळ दोन गट पडले आहेत. हेमंत संभूस काय म्हणाले, ऐका…

काय बोलणार राज ठाकरे?

आपल्या वादग्रस्त भूमिकेनंतर पक्षांतर्गत वाद तसेच भाजपा वगळता इतर पक्षांना राज ठाकरे काय उत्तर देतात, याविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या 9 तारखेला ते उत्तर देणार आहेत. मात्र आपल्या भूमिकेवर उत्तर देण्याची वेळ येणे, हेही एक अपयशच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (वसंत मोरेंनी टीव्ही9सोबत केलेली बातचीत पाहा)

आणखी वाचा :

MNS Vasant More : मनसेचा पुण्यातला ‘किल्ला’ ढासळणार? वसंत मोरे मुस्लीम कार्यकर्त्यांच्या भेटीला, राजसाहेब बघताय ना?

हे भलतंच काहीतरी! राज्य निर्बंधमुक्त, एकवीरा देवी उत्सवात मात्र गडावर कलम 144?

Video : एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार तीनवेळा झाली पलटी; लोणावळ्यातला थरार CCTVत कैद

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.