राष्ट्रवादी काँग्रेसचं अखेर ठरलं! ॲमिनिटी स्पेसचा मुद्दा निकाली,अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय

| Updated on: Aug 29, 2021 | 3:49 PM

पुण्यात सध्या अॅमिनिटी स्पेसचा (Amenity Space) मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आता भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचं अखेर ठरलं! ॲमिनिटी स्पेसचा मुद्दा निकाली,अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

पुणे : पुण्यात सध्या गाजत असलेल्या ॲमिनिटी स्पेसच्या (Amenity Space) मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आता भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. अ‌ॅमिनिटी स्पेसला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध करण्याची भूमिका निश्चित केलं आहे. अजित पवारांच्या सूचनेवरुन अ‌ॅमिनिटी स्पेसला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिली आहे.

भूमिका ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

ॲमिनिटी स्पेसच्या भाजपच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. एका गटानं विरोधी भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. ॲमिनिटी स्पेसच्या मुद्यावर दोन गट पडल्यानं अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली असून अ‌ॅमिनिटी स्पेसच्या प्रस्तावाला विरोध करणार आहे. प्रस्तावावर भूमिका ठरवण्यासाठी घेण्यात आलेली राष्ट्रवादीची बैठक संपली आहे.

नेमका प्रस्ताव काय?

भाजपकडून पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या ॲमिनिटी स्पेस दीर्घ मुदतीसाठी खासगी विकासकांना भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे निर्णयासाठी प्रलंबित आहे.

राष्ट्रवादीत दोन गट

भाजपकडून पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या ॲमिनिटी स्पेस दीर्घ मुदतीसाठी खासगी विकासकांना भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे निर्णयासाठी प्रलंबित आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरूवातीला पाच उपसूचना देण्याचा निर्णय घेऊन हा प्रस्ताव मान्य करणार असल्याचं भाजपाला सांगितलं होतं. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रस्तावावरून धुमजाव केलं होतं.

भाजप शरद पवारांची भेट घेणार

पुणे महापालिकेच्या 185ॲमिनिटी स्पेस आणि 85 आरक्षित जागा अशा एकूण 270 जागा दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर खासगी विकासकांना देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रलंबित आहे. भाजपनं सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर जरी केला तरी राज्य सरकारमार्फत हा प्रस्ताव विखंडित करण्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता थेट शरद पवारांना या प्रस्तावाची माहिती देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी वेळ मागितली आहे.

इतर बातम्या:

पुण्यातल्या अॅमिनिटी स्पेसच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय? उद्या अजित पवारांनी बोलावली महत्वाची बैठक

पुण्यातल्या अॅमिनिटी स्पेसचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात? भाजपने भेटीसाठी मागितली वेळ

NCP will oppose amenity space proposal of BJP decision taken in meeting of Ajit Pawar