पुण्यातल्या अॅमिनिटी स्पेसच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय? उद्या अजित पवारांनी बोलावली महत्वाची बैठक

पुण्यात सध्या अॅमिनिटी स्पेसचा (Amenity Space) मुद्दा गाजतोय. पुणे शहरातल्या मोक्याच्या जागा भाडेतत्वावर देण्यावरून पुण्यात (Pune) चांगलंच राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीत एकमत होत नसल्याने उपमुख्यमंत्री (Deputy CM) आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उद्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

पुण्यातल्या अॅमिनिटी स्पेसच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय? उद्या अजित पवारांनी बोलावली महत्वाची बैठक
अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 3:58 PM

पुणे : पुण्यात सध्या अॅमिनिटी स्पेसचा (Amenity Space) मुद्दा गाजतोय. पुणे शहरातल्या मोक्याच्या जागा भाडेतत्वावर देण्यावरून पुण्यात (Pune) चांगलंच राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) तळ्यात-मळ्यात असणाऱ्या भूमिकेमुळे भाजप (BJP) संभ्रमात असल्याचं चित्र आहे. शहरातल्या अॅमिनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा ठराव भाजपला बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेता आला असता. पण राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आता जास्त चर्चा होऊ लागली आहे. त्यात राष्ट्रवादीतही या अॅमिनिटी स्पेसच्या मुद्द्यावर दोन गट पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळे राष्ट्रवादीत एकमत होत नसल्याने उपमुख्यमंत्री (Deputy CM) आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उद्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. (Ajit Pawar has called a meeting of local leaders on the issue of amenity space in Pune tomorrow)

अजित पवारांनी संभ्रम ठेवला कायम

अॅमिनिटी स्पेस भाड्याने द्यायच्या मुद्दावरून राष्ट्रवादीने दोनदा यूटर्न घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत मतभेद असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात अजित पवारांनीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. एखादा निर्णय लोकांच्या हिताचा असे, शहराच्या फायद्याचा असेल आणि तर माझा नेहमी पाठिंबाच असतो असं वक्तव्य करत अजित पवारांनीही सस्पेन्स कायम ठेवला आहे.

राष्ट्रवादीत दोन गट

भाजपकडून पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या अॅमिनिटी स्पेस दीर्घ मुदतीसाठी खासगी विकासकांना भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे निर्णयासाठी प्रलंबित आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरूवातीला पाच उपसूचना देण्याचा निर्णय घेऊन हा प्रस्ताव मान्य करणार असल्याचं भाजपाला सांगितलं होतं. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रस्तावावरून धुमजाव केलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम

हा राजकीय गोंधळ सुरू असताना पुन्हा आरक्षण नसलेल्या 185 अॅमिनिटी स्पेसपैकी 33 जागांवर अर्बन फॉरेस्ट करावे, अशी भूमिका चव्हाण यांनी घेऊन प्रस्तावाला जाहीर समर्थन दिले. त्यानंतर अवघ्या 24 तासांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी या भूमिकेला आक्षेप घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम आहे.

अजित पवारांचा उद्या स्थानिक नेत्यांशी संवाद

अॅमिनिटी स्पेसच्या मुद्द्यावर अजित पवार रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत स्थानिक नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या बैठकीपूर्वी पुणे महानगर नियोजन समितीने तयार केलेल्या विकास आराखड्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. अॅमिनिटी स्पेसबाबत निर्णय घेताना नागरिकांचं हित बघितलं जाईल, नगरसेवकांचं हित पाहिलं जाणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या :

नाव राणे अन् चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांचा राणेंवर बोचरा वार

पिंपरीत थरार, ढिगाऱ्याखालून मुलीला वाचवलं, जवानांना खांद्यावर घेऊन जल्लोष

कोरोनाकाळातही पुणेकरांनी जमा केला 1 हजार कोटी मिळकत कर, महापालिकेच्या कर वसुली विभागाची विक्रमी कामगिरी

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.