Maharashtra Election News LIVE : भारत आज अनेक देशांचा विश्वासू पार्टनर झालाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Live Updates In Marathi : अमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियानावर भर. दहावी-बारावी परीक्षांसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही सक्तीचा निर्णय होता. नंतर निर्णय मागे घेतला, तरी शहरातील 90 टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध. बारावीची परीक्षा 10, दहावीची 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार.

पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक अखेर 32 तासांनंतर सुरू झाली आहे. रात्री दीडच्या सुमारास पलटी झालेला गॅस टँकर चार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहने सोडण्यात आली. सध्या मुंबई आणि पुणे अशा दोन्ही लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर मधील काँग्रेसचा अंतर्गत वाद आता न्यायालयात. गट नोंदणी मध्ये विभागीय आयुक्तांनी त्रुटी काढल्यानंतर विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. नागपूर विभागीय आयुक्तांनी विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या गट नोंदणीबाबत काही त्रुटी दाखवत त्रुटींची पूर्तता करण्याचे दिले होते काल निर्देश. मात्र या निर्देशावर वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी हायकोर्टात विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल केली.
LIVE NEWS & UPDATES
-
आटगाव रेल्वे स्थानकाजवळ जुन्या घराला लागली आग
आटगाव रेल्वे स्थानकाजवळ एका जुन्या घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. लाकडी घर असल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं आहे. आगीत संपूर्ण घर जळून भस्मसात झालं आहे. घरात कोणी राहत नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने एका तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीचे कारण अस्पष्ट आहे.
-
गोंदियात काँग्रेसचे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन
गोंदियात काँग्रेसचे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. बोनस आणि प्रलंबित चुकारांसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केला जात आहे. ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून हे आंदोलन केले जात आहे.
-
-
भारत आज अनेक देशांचा विश्वासू पार्टनर झालाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सभागृहाला संबोधित करताना समाजातील विविध गटांसाठी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. तसेच मोदींनी या दरम्यान विरोधकांवर निशाणा साधला.
आता भारताच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल तिसऱ्या क्रमांकाकडे सुरु असल्याचं मोदींनी म्हटलं. भारत आज अनेक देशांचा विश्वासू पार्टनर झालाय. भारताच्या एमएसएमईवर जगाचा विश्वास वाढलाय. मुक्त व्यापार करारामुळे देशातील युवकांना फायदा झालाय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
नागपुरात अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कडून नागपुरात अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शोकसभेत अनिल देशमुख, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सुनील केदार आणि भाजपचे संदीप जोशी आणि जोगेंद्र कवाडे उपस्थित आहेत.
-
सांगली – जतच्या 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यंत सुटेल – चंद्रकांत पाटील
सांगलीच्या जत तालुक्यातल्या 65 गावांचा पाण्याचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यंत सुटेल,अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संख तालुक्यातल्या पार पडलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
-
-
मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे ट्रॅफिक जाम, आदित्य ठाकरे यांची टीका
एमएसआरडीसीला पत्र वगैरे न देता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर आदेश द्यायला पाहिजेत.परंतू एमएसआरडीसी कोणाकडे आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचा ऐकत नसतील असा टोला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
-
घोडबंदर रोडवर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
ठाण्यातील घोडबंदर रोडवर ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
-
जळगाव: उद्या महापौराची निवड आणि महापालिकेच्या सभागृहाची अवस्था दयनीय…
जळगावात उद्या महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. ज्या सभागृहात जळगाव शहराच्या विकासंदर्भातील निर्णय होतील, त्या सभागृहाची मात्र दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-
विमानात काय घडलं? रोहित पवारांनी थेट….
विमानात काय घडलं, हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन… बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया… कुटुंबात सध्या कोणतीही राजकीय चर्चा नाही.. विलीनीकरणावर रोहित पवारांचं विधान
-
गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलासा… गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात रुग्णालयाच्या विश्वस्तांवर फौजदारी कारवाईला मुंबई उच्च न्य़ायालयाकडून तात्पुरती स्थगिती… 6 मार्चला पुढील सुनावणी….
-
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाद आता थेट सुप्रीम कोर्टात
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाद आता थेट सुप्रीम कोर्टात.. राजकुमार धरगुडे यांनी केली याचिका दाखल.. साहित्य परिषदेच्या निवडणूक आणि अनुषंगिक बदल अहवालाबाबत निर्णय करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप..
-
अंधेरी पूर्व पंप हाऊसजवळील इमारतीला आग, कोणीही जखमी नाही
अंधेरी पूर्व पंप हाऊसजवळील इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर लागलेल्या आगीत एक कार जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
अपघाताच्या दिवशी विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर सांगू, कुटुंबात राजकीय चर्चा नाही – रोहित पवार
28 तारखेला अपघाताच्या दिवशी विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर सांगेन. सध्या कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही – विलीनीकरणाच्या प्रश्नावर रोहित पवार यांनी दिलं उत्तर
-
जालना – कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकास बडतर्फ करणार -जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
दहावी-बारावी परीक्षांसाठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज असून कॉपीमुक्त अभियान राबवणार आहेत. जालना जिल्ह्यात 12 वीच्या परीक्षेसाठी 37 हजार 338 तर 10 वीच्या परीक्षेसाठी 32 हजार 433 विध्यार्थी बसणार आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. तर परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल. कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकास बडतर्फ करणार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हा मोठा इशारा दिला आहे.
-
चंद्रपूर मनपा मधील धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार गटातील संघर्षाला विराम ?
नागपूर – चंद्रपूर मनपा मधील धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार गटातील संघर्षाला विराम ? वडेट्टीवार गटाचे उमेदवार उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वडेट्टीवार गटाचे उपमहापौर पदाचे उमेदवार वसंत देशमुख चंद्रपूर कडे निघाले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
-
लोणावळ्यातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
आडोशी बोगदाजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर मोठा ताण आलेला आहे. एक्सप्रेस वेवर वाहनांची मोठी गर्दी असल्यामुळे अनेक जण जुन्या मार्गाचा वापर करत आहे परिणामी लोणावळा नगरीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या रांगा लागल्या आहेत. कुमार चौकापासून ते मेपल गार्डन पर्यंत ही वाहतूक कोंडी आहे.
-
संकष्ट चतुर्थी निमित्त ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच गर्दी
संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायक गणपती मधील ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केलीय . सकाळी बाप्पांची महापूजा करण्यात आली आहे त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. बाप्पाला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली असून अलंकारांनी सजविण्यात आले आहे .
-
लोकशाही धोक्यात असं बोलणं चुकीचं – जे. पी. नड्डा
लोकशाही धोक्यात असं बोलणं चुकीचं… लोकसभेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करु शकत नाही… काँग्रेसनं अभिमान आणि अहंकार सोडला पाहिजे… विरोधकांनी लोकसभेचं कामकाज होऊच दिलं नाही… असं वक्तव्य जे.पी. नड्डा यांनी केलं आहे.
-
प्रशासनाच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी बाजार बेमुदत बंद
नागपूरच्या कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. प्रशासनाच्या विरोधात भाजी व्यापारांनी आजपासून भाजी बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा आवाहन केला आहे. मात्र दुसरीकडे बाजार समितीने हा संप बेकायदेशीर ठरवत बाजार सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पणन संचालकांच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन करून गाळेवाटप केल्याचा प्रशासनावर आरोप आहे. तसेच आपल्या अधिकारांचा सभापती गैरवापर करीत असल्याचाही व्यापाऱ्यांनी आरोप केला आहे. तर दुसरीकडे भाजी बाजाराचे काम नेहमीप्रमाणे पूर्णतः सुरळीत राहील असं बाजार समितीने स्पष्ट केला आहे.
-
जळगावात महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक…
पदोन्नतीची प्रक्रिया, पुरेसे हे मनुष्यबळ ,सर्व समावेशक आकृतीबंध यासह विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये 8 हजार अधिकारी, कर्मचारी अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शासनाच्या शासकीय कामकाजाच्या व्हाट्सअप ग्रुप मधून अधिकारी, कर्मचारी लेफ्ट, आजपासून व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सुद्धा सहभागी होणार नसल्याचा पावित्रा घेतला आहे. एकीकडे केवायसी करूनही हक्काचे पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये संतापाची लाट असून महिलांमधून रोष व्यक्त केला जात आहे.. आता अंगणवाडी सेविकांनी आणि महिला-बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने लाडक्या बहीण योजनेचे कामकाज ठप्प झाले आहे. जिल्ह्यातील १ लाख ८ हजार महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण ; पडताळणीचे काम ठप्प झाले असून, पात्र असूनही हजारो महिला लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
-
चंद्रपुरात महापौर निवडीचा थरार, विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानी खलबतं
चंद्रपूर महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली असतानाच, नेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपूर येथील निवासस्थानी त्यांच्या समर्थित नगरसेवकांनी मोठी गर्दी केली आहे. दिल्ली हायकमांडने दिलेले निर्देश आणि स्थानिक सत्तासंघर्षाचा समतोल राखण्यासाठी वडेट्टीवार सध्या नगरसेवकांसोबत बंद दाराआड महत्त्वाची बैठक घेत आहेत. या बैठकीत नेमकं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं आणि वडेट्टीवार गट कोणती नवी खेळी खेळतो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
-
अजित पवारांचा घातपात, बड्या नेत्यांवर संशयाची सुई; अंजली दमानियांचा आरोप काय?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, अजित पवारांचा घातपात झाला आहे, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर लक्षात येते की, धावपट्टीवर सरळ येणारे विमान अचानक पालटले. सध्या मी या प्रकरणातील तांत्रिक माहिती गोळा करत असून लवकरच त्या पुराव्यांसह मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया यांनी या प्रकरणात थेट राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार या तिघांचा या घातपातामागे हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
-
आता माझे समाधान झाले आहे, सुनील केदार यांचे स्पष्टीकरण, नाराजी अखेर दूर
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपली नाराजी दूर झाल्याचे स्पष्ट केले आहे. सुनील केदार यांनी स्थानिक राजकारणातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे. वरिष्ठांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर माझे समाधान झाले असून, आता पक्षीय कार्यात सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अज्ञात स्थळी जाण्याच्या अफवांचे खंडन करताना त्यांनी स्पष्ट केले की, ते केवळ नगरसेवकांना आवश्यक सूचना देण्यासाठी जाणार आहेत. आगामी महापौर आणि उपमहापौर पदांच्या कार्यकाळाबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे सांगत केदारांनी सध्या तरी पक्षीय शिस्तीला प्राधान्य दिले आहे.
-
जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, सदाभाऊ खोत यांचा दावा
सांगलीच्या वाळवा येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. जयंत पाटील सत्तेविना जगू शकत नाहीत, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा टोला सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या सभेत लगावला होता. खोतांच्या या विधानाचा समाचार घेताना जयंत पाटील यांनी दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे आणि मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतोय,” अशा शब्दांत खोचक प्रतिउत्तर दिले.
-
पैठणमध्ये शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी, प्रतिष्ठा पणाला
छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी आता भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट या सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नगरपरिषदेतील विजयानंतर भुमरे पिता-पुत्रांचा आत्मविश्वास दुणावला असला, तरी दत्ता गोर्डे, संजय वाघचौरे आणि अनिल पटेल यांसारख्या तगड्या नेत्यांनी सत्ता विरुद्ध जनभावना असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत न राहता प्रतिष्ठेची मोठी कसोटी ठरली आहे.
-
नाशिकचे नगरसेवक आज जाणार सहलीला
उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे नगरसेवक होणार अज्ञात स्थळी रवाना. भाजपा कार्यालयापासून नगरसेवक एकत्रित जाणार सहलीला. उद्या होणाऱ्या निवडणुकी संदर्भात नगरसेवकांना दिल्या जाणार सूचना
-
सोबत फिरायला चल असे सांगून सुरत येथे नेऊन मुलीवर अत्याचार
जळगावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सोबत फिरायला चल असे सांगून सुरत येथे नेऊन मुलीवर तिच्या अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे पीडित मुलीने जळगावात आल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली
-
उल्हासनगर शहरात गेल्या 5 दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे हाल
कॅम्प 5 परिसरातील रहिवासी राजाराम पवार यांनी संतापाच्या भरात अर्धनग्न होऊन बाईकवरून पाणीपुरवठा कार्यालयात दिली धडक. अधिकाऱ्यांना जाब विचारतानाचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
-
नाशिकचे महापौर आणि उपमहापौर सव्वा वर्षासाठी सूत्रांची माहिती
भाजपातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपाचा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला? महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी दिला होता राजीनामा. सव्वा वर्षानंतर पुन्हा दुसऱ्याला संधी देण्यात येईल या आश्वासनानंतर सुनील केदार यांनी राजीनामा माघे घेतल्याची माहिती. उद्या होणार आहे महापौरणी उपमहापौर पदासाठी निवडणूक
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी भाजप नेत्यात एकमत होत नसल्याची माहिती
मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर व किशोर शितोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महापौर पदावरून वाद झाल्याची सुत्राची माहिती. निवड प्रक्रियेवर भाजप नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने महापौर पदासाठी 4 तर गटनेते पदासाठी 4 नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती.
-
नागपूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा उघडकीस
नागपूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची मनमानी कार्यप्रणाली आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघडकीस. एका सेवानिवृत्त नागरिकाला थेट पाठवले 14 महिन्यांचे एकत्रित 43 हजार 234 रुपयांचे पाणी बिल. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात राहणाऱ्या सी.एम. लोणारे यांना मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने हे बिल पाठवले आहे. 1 एप्रिल 2024 ते 30 जून 2025 या कालावधीचे बिल पाठवले आहे
-
नाशिकचे महापौर आणि उपमहापौर सव्वा वर्षासाठी
नाशिकचे महापौर आणि उपमहापौर सव्वा वर्षासाठी सूत्रांची माहिती. भाजपातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपाचा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला?. महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी दिला होता राजीनामा. सव्वा वर्षानंतर पुन्हा दुसऱ्याला संधी देण्यात येईल या आश्वासनानंतर सुनील केदार यांनी राजीनामा मागे घेतल्याची माहिती. उद्या होणार आहे महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक. आज सर्व नगरसेवकांना भाजप आज्ञास्थळी हलवणार
-
महापौर पदासाठी भाजप नेत्यात एकमत होत नसल्याची माहिती
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी भाजप नेत्यात एकमत होत नसल्याची माहिती. मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर व किशोर शितोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महापौर पदावरून वाद झाल्याची सुत्राची माहिती. निवड प्रक्रियेवर भाजप नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने महापौर पदासाठी 4 तर गटनेते पदासाठी 4 नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती.
-
मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीची तारीख ठरली
मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 11 फेब्रुवारीला होणार आहे. बहुमत असल्यामुळे भाजपचाच महापौर होणार हे निश्चित झाले असून उपमहापौर पद शिवसेना (शिंदे) पक्षाकडे जाणार आहे. उपमहापौर पदीही महिलेचीच नेमणूक होणार असल्याची चर्चा असून त्याकरिता नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. उपमहापौर पदासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि माजी नगरसेविका यामिनी जाधव यांची नावे चर्चेत आहेत. 2014 मध्ये महापौर पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले होते. त्यावेळी महापौर पदासाठी स्नेहल आंबेकर आणि यामिनी जाधव यांच्या नावांची चर्चा होती. तेव्हा यामिनी जाधव यांना महापौर पदाने हुलकावणी दिली होती.
-
पार्थ पवार यांचे नाव किंवा स्वाक्षरी नसल्याने क्लीन चिट
महसूल विभागाच्या विकास खारगे समितीचा अहवाल सादर. पार्थ पवार यांचे नाव किंवा स्वाक्षरी नसल्याने क्लीन चिट. अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील या प्रकरणात दोषी. जमीन विक्रेता शीतल तेजवानी आणि संबंधित नोंदणी अधिकारीही जबाबदार. अमेडिया कंपनीकडून 21 कोटी मुद्रांक शुल्क वसुलीची शिफारस. 1800 कोटींची 40 एकर जमीन 300 कोटींना खरेदी केल्याचा होता आरोप. आयटी पार्कच्या नावाखाली मुद्रांक शुल्क माफीवरून वाद.
Published On - Feb 05,2026 8:29 AM
