नाव राणे अन् चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांचा राणेंवर बोचरा वार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 28, 2021 | 2:18 PM

महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे.

नाव राणे अन् चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांचा राणेंवर बोचरा वार
narayan rane

पुणे: महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे. नाव राणे आणि चर्चा मात्र चार आण्याची करतात, अशी खोचक टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे. (abdul sattar slams narayan rane over chaos between shiv sena and bjp)

आळे ग्रामपंचायतीचं आणि शिवसेना शाखेचं उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपमध्ये फक्त बोलण्यासाठी आहे. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्चा फक्त चार आण्याची करतात, अशी खोचक टीका सत्तार यांनी केली आहे.

भाजप बाभळीच्या झाडाखाली

मुख्यमत्री उद्धव ठाकरे कुठे आणि राणे कुठे? बाळासाहेब ठाकरेंनी नाऱ्यापासून त्यांना नारायण राणेंपर्यंत पोहोचवलं. त्याचं भान त्यांनी ठेवले पाहिजे. पण ते विसरले, असा टोलाही सत्तार यांनी लगावला. भाजपा आमच्या सोबत होता तोपर्यंत ते आंब्याच्या झाडाखाली बसले होते. मात्र आता राणेंच्या समावेशामुळे ते बाभळीच्या झाडाखाली बसले आहेत. याचे भान भाजपने ठेवले पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला. राणे आगळ्यावेगळ्या भाषेत बोलले खरे मात्र शिवसैनिक त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देतील. त्यांनी त्याची भाषा वेळीच सुधरवली पाहिजे असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

एका व्यक्तीमुळे नातं बिघडलं

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंवर हल्ला चढवला. एकमेकांच्या कार्यालयावर हल्ला करणे उद्धव ठाकरे आणि आम्हाला आवडत नाही. भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे. मात्र एका व्यक्तीमुळे हे नात बिघडलं. राणे जे बोलताय ते फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार बोलू शकत नाही म्हणून त्यांनी राणेंना बोलायला पुढे केलं, असा आरोप राऊत यांनी केला.

यात्रा शब्द पवित्र

कोकणात तुमचा कितीदा पराभव झालंय हे बघावं. सेना व्यक्तीमुळे नाही तर बाळासाहेबांच्या विचारामुळे आहे, असं सांगतानाच यात्रा हा पवित्र शब्द आहे. जे पावित्र्य जपून यात्रा काढता त्यांना त्याचा फायदा होतो. शिवसेना ही यात्रा आहे, जी बाळासाहेबाणी सूरु केली आहे, असं राऊत म्हणाले. (abdul sattar slams narayan rane over chaos between shiv sena and bjp)

संबंधित बातम्या:

राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय, त्यांनी विपश्यना करावी; संजय राऊतांचे हल्ले सुरूच

अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करू; संजय राऊतांचा राणेंना अप्रत्यक्ष इशारा

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर

(abdul sattar slams narayan rane over chaos between shiv sena and bjp)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI