आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर

शिवसेना आणि नेत्यांची सगळी प्रकरणं मी हळूहळू बाहेर काढतो, असा उघड इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर आम्ही सभ्यपणा पाळतोय, पण कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर राऊतांनी राणेंना दिलं आहे.

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर
माझ्या फंदात पडू नकोस; नारायण राणेंचा संजय राऊतांना थेट इशारा
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 11:50 AM

नाशिक :  शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना आणि नेत्यांची सगळी प्रकरणं मी हळूहळू बाहेर काढतो, असा उघड इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर आम्ही सभ्यपणा पाळतोय, पण कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर राऊतांनी राणेंना दिलं आहे.

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. आज शिवसेनेच्या कार्यक्रमात राऊतांनी राणेंचे अक्षरश: वाभाडे काढले तसंच जे वादळ उठलंय ते अद्याप संपलेलं नाही, असं म्हणत राणेंना एकप्रकारे इशाराच दिला.

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत

“ते म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू, मग आम्ही त्यांना विचारतो, तुम्हाला कुंडल्या नाहीत का…? आम्ही तुमचे संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा, असा निर्वाणीचा इशारा देत बोलताना जरा जपून बोला”, असा सल्ला राऊतांनी राणेंना दिला आहे.

अनेकांनी शिवसेना सोडली, पण यांच्यासारखा उतमात कुणी केला नाही

“जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात. ज्यांनी राणेंच्या विरोधात आयुष्य घालवलं. सेनेतून अनेक जण गेले, पण ह्यांच्या सारखा उतमात कोणी केला नाही. पण उध्दवजीनी सांगितलं, वेडंवाकडं केलं तर सोडणार नाही”, असंही राऊतांनी सांगितलं.

म्हणून मी आज नाशिकला आलोय!

राणेंच्या विरोधात जिथून पहिली ठिणगी पडली त्या नाशिकचं कौतुक करताना संजय राऊत म्हणाले, “गुन्हा दाखल करण्याचं हिमतीच काम नाशिकमध्येच होऊ शकत, हे मला माहिती होतं. ज्या हिमतीने तुम्ही ही लढाई लढता आहात, त्या साठीच मी नाशिकला आलोय. भविष्यात नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे.”

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत. सर्व जुनीप्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार, आवाज खणखणीत झाला की खणखणीत वाजवणार, असा इशारा नारायण राणे यांनी काल कोकणात जनआशीर्वाद यात्रेत दिला होता.

रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना नारायण राणे यांनी हा इशारा दिला. आता जुन्या गोष्टी काढणार आहेत. काढा ना… दोन वर्षे झाली. शोधत आहेत. काढत आहेत. काढाना… आम्हालाही जुन्या गोष्टी माहीत आहे. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. जया जाधवची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. माहीत आहे. आपल्याच बंधुच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितलं? कोणाला सांगितलं? आणि संस्कार. असे संस्कार. आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकण्याचे… मी टप्याटप्याने सर्व काढणार. सुशांतची केस संपली नाहीये. दिशा सालियनचीही संपली नाही. मी केंद्रात मंत्री आहे. जरा आठवण करा. रिस्ट्रिक्शन देऊन काय करणार. अटक? किती दिवस. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, असं दमच राणेंनी भरला.

(Shivsena Sanjay Raut Answer union Minister Narayan Rane At Nashik)

हे ही वाचा :

वहिनींवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? टप्प्याटप्प्याने सगळं बाहेर काढणार : नारायण राणे

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.