राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय, त्यांनी विपश्यना करावी; संजय राऊतांचे हल्ले सुरूच

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. राणेंचं मनस्वास्थ बिघडलं आहे. (sanjay raut)

राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय, त्यांनी विपश्यना करावी; संजय राऊतांचे हल्ले सुरूच
दिल्लीत आपली महाराष्ट्रापेक्षा जास्त वट, राणेंचं वक्तव्य

नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. राणेंचं मनस्वास्थ बिघडलं आहे. त्यांनी विपश्यना करावी, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. (narayan rane should do Vipassana Meditation, says sanjay raut)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं. नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत. त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडतात. त्यांचं मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांनी विपश्यना करावी. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, असा चिमटा राऊत यांनी काढला. उद्यापासून लाखो शिवसैनिक राणेंच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करणार आहेत. भाजपने देखील प्रार्थना करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

त्या दोघांना हजर राहण्याच्या सूचना

यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांच्या भेटीवरही भाष्य केलं. नाशिकचे पोलीस आयुक्तांना मी आज ओळखत नाही. आमचं कौटुंबिक नात आहे. ते प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी आहेत. अशा अधिकाऱ्यांना भेटणं मला आवडतं, असं त्यांनी सांगितलं. मी देखील खासदार आहे. मला कायद्याचा अभ्यास आहे. मी कायदा तोडत नाही. मी त्या दोघांना पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

एका व्यक्तीमुळे नातं बिघडलं

एकमेकांच्या कार्यालयावर हल्ला करणे उद्धव ठाकरे आणि आम्हाला आवडत नाही. भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे. मात्र एका व्यक्तीमुळे हे नात बिघडलं. राणे जे बोलताय ते फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार बोलू शकत नाही म्हणून त्यांनी राणेंना बोलायला पुढे केलं, असा आरोपही त्यांनी केला.

यात्रा शब्द पवित्र

कोकणात तुमचा कितीदा पराभव झालंय हे बघावं. सेना व्यक्तीमुळे नाही तर बाळासाहेबांच्या विचारामुळे आहे, असं सांगतानाच यात्रा हा पवित्र शब्द आहे. जे पावित्र्य जपून यात्रा काढता त्यांना त्याचा फायदा होतो. शिवसेना ही यात्रा आहे, जी बाळासाहेबाणी सूरु केली आहे, असं राऊत म्हणाले.

तेव्हा अस्मिता कुठे गेली होती?

राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत खासदार संभाजी छत्रपती यांचा पुढारी बनण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. संभाजी छत्रपती हे छत्रपती आहेत. त्यांच्या नावाला एक वेगळं वलय आहे. छत्रपती हे पुढारी आहेत. संभाजीराजे जेव्हा संसदेत बोलत होते तेव्हा भाजपचे सर्व खासदार मूग गिळून बसले होते. मी त्यांनी बोलू देण्यासाठी आग्रह धरला होता. संभाजीराजेंना बोलू दिलं जात नव्हतं तेव्हा भाजपची अस्मिता कुठे गेली होती, असा सवालही त्यांनी केला. (narayan rane should do Vipassana Meditation, says sanjay raut)

 

संबंधित बातम्या:

अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करू; संजय राऊतांचा राणेंना अप्रत्यक्ष इशारा

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर

VIDEO : मी न घाबरणारा मराठा आहे, उज्ज्वल निकम यांचं बेधडक भाषण

(narayan rane should do Vipassana Meditation, says sanjay raut)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI