पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) फुगेवाडी (Fugewadi) परिसरात आज सकाळी मातीचे बांधकाम असलेली दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये पौर्णिमा संभाजी मडके ही 14 वर्षीय मुलगी ढिगाऱ्याखाली अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या मुलीला वाचवण्यात यश मिळवलं आहे. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (A girl trapped under a pile of buildings was rescued by firefighters In Pimpri-Chinchwad)