पुण्यात 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून अत्याचार, पोलिसांनी दरवाजा तोडून चौघांना रंगेहाथ पकडलं

पुण्यात 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुण्यात 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून अत्याचार, पोलिसांनी दरवाजा तोडून चौघांना रंगेहाथ पकडलं
सांकेतिक फोटो

पुणे : पुण्यात 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महिलेचा मदतीसाठी पोलिसांना फोन

दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला मदतीसाठी एका महिलेचा फोन आला. त्यावेळी महिलेने रडत रडत मदत मागितली. आम्ही घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी दाखल झालो.”

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला

“आम्ही घटनास्थळी पोहोचल्यावेळी, तिथे काही महिलांचा जमाव होता. त्यांच्या म्हणण्यानुसार घरातून आणखीही रडण्याचा आवाज येत होता. आम्ही तात्काळ घराजवळ जाऊन त्या महिलेला आवाज देऊ लागलो. मात्र आम्हालाही महिलेने प्रतिसाद दिला नाही. घरातून केवळ रडण्याचा आवाज आला. मग आम्ही घराचा दरवाजा तोडला.”

नराधमांना बेड्या, महिला रुग्णालयात दाखल

“घटनेतील आरोपी पीडित महिलेसह आम्हाला आढळून आले. आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं. तसंच महिलेला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. नराधमांवर तात्काळ गुन्हे दाखल केले आहेत”, अशी माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली आहे.

(Pune Gangrape 4 accused Arrest Dattawadi pune Police)

हे ही वाचा :

रडत-रडत सुसाईड VIDEO काढला, छळाची ‘आपबिती’ सांगितली, ठाण्यात महिलेची आत्महत्या

‘कार हळू चालव’ म्हटल्याने डोक्यात गेला राग, लाथाबुक्क्यांनी मारलं, रक्तबंबाळ व्यक्तीचा अखेर मृत्यू

चारित्र्यावर संशय, पत्नीचं गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवलं, ‘सर्किट’ पतीच्या विकृतीचा कळस

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI