ठाणे : सासरच्या जाचाला आणि छळाला कंटाळून ठाण्यातील वर्तकनगर भागात एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय (Thane woman suicide video). विशेष म्हणजे पीडित महिलेने आत्महत्येपूर्वी रडत-रडत एक सुसाईड व्हिडीओ तयार केलाय. त्यात तिला पती आणि सासरच्या लोकांकडून कसा त्रास दिला जातोय हे सांगितलंय. तिने आत्महत्येपूर्वी हा व्हिडीओ आपल्या जवळच्या मैत्रिणींना पाठवल्यानं याबाबत माहिती समोर आलीय. या व्हिडीओत पीडितेने तिला लग्नानंतर मागील 11 वर्षांपासून कसा त्रास सहन करावा लागतोय याविषयी सांगितलंय.