साताऱ्यातील धक्कादायक घटना, मातेने पोटच्याच लेकरांना संपवलं, जन्मदाती आईने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला?

सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या पोटच्या मुलांचीच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने स्वत: विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

साताऱ्यातील धक्कादायक घटना, मातेने पोटच्याच लेकरांना संपवलं, जन्मदाती आईने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला?
साताऱ्यातील धक्कादायक घटना, मातेने पोटच्याच लेकरांना संपवलं, जन्मदाती आईने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला?

सातारा : सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या पोटच्या मुलांचीच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने स्वत: विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पण ती सुदैवाने बचावली आहे. सध्या तिची देखील प्रकृती गंभीर आहे. कराडच्या एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. आईने इतंक टोकाचं पाऊल उचलायला नको होतं, असं मत अनेकांकडून मांडण्यात येत आहे.

महिलेची प्रकृती गंभीर

संबंधित घटना ही कराड शहरात घडली आहे. 35 वर्षीय महिलेने आपल्या पोटच्या मुलांची गळा दाबून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने आपल्या 6 आणि 9 वर्षीय मुलांची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच महिलेने स्वत: विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेची सध्या प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांना सुसाईड नोट सापडली

दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना तिथे महिलेची सुसाईड नोट सापडली. त्या सुसाईड नोटमध्ये महिलेने नैराश्यातून आपण हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे.

महिलेने सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

“सहा महिन्यांपूर्वी अपघातात पतीचे निधन झाले. पतीच्या निधनामुळे मी व्यथित झाली आहे. त्यामुळे मन खचल्याने मी हे कृत्य करत आहे”, अशी सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळी पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, या घटनेचा कराड पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा :

ती फक्त माझीच होणार, मुलीसाठी दोस्ती तोडली, धारदार शस्त्राने हत्या, नागपूर हादरलं

फेसबुकवरील मैत्री पडली महाग, नवी मुंबईत विधवा महिलेला सायबर गुन्हेगारांनी घातला 13 लाखांचा गंडा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI