ती फक्त माझीच होणार, मुलीसाठी दोस्ती तोडली, धारदार शस्त्राने हत्या, नागपूर हादरलं

नागपुरात प्रचंड भयानक घटना घडली आहे. एका मुलीसाठी दोन मित्रांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर एकाने दुसऱ्या मित्राच्या पोटात टाकू खोपसून त्याची हत्या केली.

ती फक्त माझीच होणार, मुलीसाठी दोस्ती तोडली, धारदार शस्त्राने हत्या, नागपूर हादरलं
मुलीसाठी दोस्तीत कुस्ती, दोन मित्र समोरासमोर भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले, अखेर एकाची हत्या

नागपूर : नागपुरात प्रचंड भयानक घटना घडली आहे. एका मुलीसाठी दोन मित्रांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर एकाने दुसऱ्या मित्राच्या पोटात चाकू खोपसून त्याची हत्या केली. मृतक तरुणाचे नाव अमनदीपसिंग कुलदीपसिंग उर्फ पाज्जी असं होतं. मित्र सम्यक बागडे याने पाज्जीची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सम्यक बागडेला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही कपिल नगर पोलीस ठाणे हद्दीतील म्हाडा कॉलनीत घडली. मृतक पाज्जी हा आपला मित्र सम्यक बागडेला भेटण्यासाठी म्हाडा कॉलनी गल्ली नंबर 17 मध्ये गेला होता. तिथे एका तरुणीच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद झाला. बघता-बघता हा वाद इतका विकोपाला गेला की सम्यक बागडेने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने पाज्जीवर वार केले. या हल्ल्यात पाज्जीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला.

घटनेनंतर काही वेळाने परिसरातील नागरिकांना पाज्जीचा मृतदेह दिसला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

आरोपीला बेड्या

पोलिसांनी या प्रकरणाता तपास करत पाज्जीची हत्या करुन पळालेल्या मित्र सम्यक बागडे याला अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित परिसरात याआधीही अशीच घटना घडलीय

दरम्यान, क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राचीच हत्या केल्याने संपूर्ण शहरात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात याच परिसरात कमलेश सहारे नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. कमलेशची हत्या देखील प्रेम प्रकरणातून झाली होती. त्यामुळे नागपुरात नेमकं काय सुरुय? असा सवाल अनेकांना पडतोय.

हेही वाचा :

सुनेला भाडेकरुसोबत विचित्र परिस्थित बघितलं, संतापाचा पारा चढला, सासऱ्याने मध्यरात्री पाच जणांना संपवलं, हत्येचा भयानक थरार

सामसूम रस्ता बघून महिलेला हेरलं, गाडी थांबवली, चाकू दाखवत दमदाटी, दागिने हिसकावले, पोलिसांनी आरोपीला बरोबर घेरलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI