सुनेला भाडेकरुसोबत विचित्र परिस्थित बघितलं, संतापाचा पारा चढला, सासऱ्याने मध्यरात्री पाच जणांना संपवलं, हत्येचा भयानक थरार

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या गुरुग्राममधून प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. एका निवृत्त सैनिकाने आपल्या सुनेची धारदार शस्त्राने हत्या केली आहे.

सुनेला भाडेकरुसोबत विचित्र परिस्थित बघितलं, संतापाचा पारा चढला, सासऱ्याने मध्यरात्री पाच जणांना संपवलं, हत्येचा भयानक थरार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 3:03 PM

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या गुरुग्राममधून प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. एका निवृत्त सैनिकाने आपल्या सुनेची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी सासऱ्याने फक्त सुनेचीच नाही तर आणखी चार जणांची हत्या केली. यामध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. तसेच आरोपीने देखील आपला गुन्हा कबूल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरोपी सासऱ्याचं नाव राय सिंह असं आहे. त्याने आपल्या घराच्या वरच्या खोल्या एका कुटुंबाला भाड्याने दिल्या आहेत. त्या खोल्यांमधील एका पुरुषासोबत त्याच्या सूनेचं अनैतिक संबंध होते. राय सिंहने दोघांना एकदा रंगेहात पकडलं होतं. त्यामुळे त्याच्या संतापाचा पारा चढला होता. त्याने दोघांचा काटा काढायचं ठरवलं होतं. त्यामुळे तो गेल्या सहा ते सात महिन्यांपासून त्यांच्या हत्येचा कट आखत होता. अखेर त्याने आपल्या सूनेची हत्या केली. यासोबतच त्याने सुनेचा प्रियकर, त्याची पत्नी आणि त्याच्या दोन्ही मुलांची हत्या केली. विशेष म्हणजे हत्या करण्याआधी आरोपीने आपल्या मुलाला काही कामानिमित्त बाहेरगावी पाठवलं. त्यानंतर पाच जणांची हत्या केली.

हत्येच्या रात्रीचा थरार

आरोपीने आपल्या मुलाला बाहेरगावी पाठवलं होतं. मुलगा घरात नाही याची संधी साधून आरोपीने हत्येचं नियोजन केलं. आरोपी राय सिंहने रात्री अकरा वाजेच्या सुमारास धारदार चाकू आपल्या जवळ ठेवला. त्यानंतर त्याने घरातील सर्व लाईट बंद केले. रात्री दोन वाजेच्या सुमारास तू आपल्या सुनेच्या खोलीत गेला. त्याने खोलीत प्रवेश करण्याआधी दरवाजा ठोठावला. सुनेने दरवाजा उघडताच राय याने धारदार चाकूने तिच्यावर वार केले. अखेर या हल्ल्यात सुनेची हत्या झाली.

सुनेची हत्या केल्यानंतर आरोपी आपल्या घराच्या वरच्या माळ्यावर गेला. तिथे भाडेकरु कृष्ण तिवारी आपल्या कुटुंबासह राहत होता. रायने आधी दरवाजा ठोठावला. कृष्णने जसा दरवाजा उघडला तसा आरोपीने त्याच्यावर हल्ला करत त्याची हत्या केली. त्याने 2 वाजून 20 मिनिटांनी कृष्णची हत्या केली. त्याच्या हत्येनंतर तो जवळपास अडीचच्या सुमारास कृष्णची पत्नी अनामिकाच्या खोलीत आला. आरोपीने तिची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या दोन लहान मुलांची देखील हत्या केली. पोलिसांनी जेव्हा आरोपीला मुलांची काय चूक होती, त्यांचा खून का केला? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं संगोपन कोण करतं या विचाराने आपण हत्या केली, असा कबुलीजबाब आरोपी राय सिंह याने दिला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा :

भाच्याच्या मदतीने मावशीने सासूचा काटा काढला, पुणे-मुंबई महामार्गावर फेकला मृतदेह

पती निधनानंतर 22 वर्षीय पत्नीची आत्महत्या, विरारमध्ये दाम्पत्याचा करुण अंत

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.