AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाच्याच्या मदतीने मावशीने सासूचा काटा काढला, पुणे-मुंबई महामार्गावर फेकला मृतदेह

मावशीने सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने आपल्या सासूचा काटा काढण्याचा प्लॅन आखला होता. हत्येनंतर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला तिचा मृतदेह टाकून दिला होता

भाच्याच्या मदतीने मावशीने सासूचा काटा काढला, पुणे-मुंबई महामार्गावर फेकला मृतदेह
मावशीने सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने आपल्या सासूची हत्या केली
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 25, 2021 | 8:50 AM
Share

पिंपरी चिंचवड : सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने मावशीने सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर सासूचा मृतदेह पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला टाकून देण्यात आला होता. या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मावशीने सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने आपल्या सासूचा काटा काढण्याचा प्लॅन आखला होता. हत्येनंतर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला तिचा मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणाची गुन्हे शाखा युनिट दोन आणि देहूरोड पोलिसांनी उकल केली आणि सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या.

सराईत गुन्हेगाराला अटक

या प्रकरणी इम्तियाज ऊर्फ चिंट्या मुस्ताक शेख या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. तर मुन्नी जोगदंड असे आरोपी मावशीचे नाव आहे. दोघांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमला पोलीस आयुक्तांनी 40 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पुण्यात प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे फेकले

दुसरीकडे, प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरुन फेकणाऱ्या प्रियकरालाही पुण्यात अटक करण्यात आली आहे. तब्बल बारा दिवसांनंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला. तीस वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी 40 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्रेयसीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिंदे याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

हनुमंत अशोक शिंदे (वय 40 वर्ष, रा. बुधवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी (वय 30 वर्ष, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हनुमंतने प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. त्यानंतर ते पोत्यात भरुन पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून दिले होते.

संबंधित बातम्या :

आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात जावयाची आत्महत्या

प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे मुठा घाटात फेकले, पुण्यात 40 वर्षीय प्रियकराला अटक

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!