प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे मुठा घाटात फेकले, पुण्यात 40 वर्षीय प्रियकराला अटक

आरोपी हनुमंत शिंदेने प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. त्यानंतर ते पोत्यात भरुन पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून दिले होते. बारा दिवसांनी या प्रकाराचा उलगडा झाला

प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे मुठा घाटात फेकले, पुण्यात 40 वर्षीय प्रियकराला अटक
प्रेयसीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे घाटात फेकले

पुणे : प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरुन फेकणाऱ्या प्रियकराला पुण्यात अटक करण्यात आली आहे. तब्बल बारा दिवसांनंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला. तीस वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी 40 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

हनुमंत अशोक शिंदे (वय 40 वर्ष, रा. बुधवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी (वय 30 वर्ष, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हनुमंतने प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. त्यानंतर ते पोत्यात भरुन पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून दिले होते.

12 दिवसांनी खुनाचा प्रकार उघड

12 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास नारायण पेठ परिसरात खुनाची घटना घडली होती. तब्बल 12 दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आला. प्रियकराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. प्रेयसीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिंदे याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पुण्यात सासरच्या त्रासामुळे जावयाची आत्महत्या

दुसरीकडे, सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच पुण्यात समोर आली होती. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा आरोप झाला. वर्षभरापूर्वीच तरुणाचं लग्न झालं होतं. तरुणाजवळ सुसाईड नोटही सापडली असून त्यात ‘आई, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन’ असं त्याने लिहिलं होतं.

संबंधित बातम्या :

मोबाईल स्पीकरवर गाणं लावून राहत्या घरात गळफास, नाशकात 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात जावयाची आत्महत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI