मोबाईल स्पीकरवर गाणं लावून राहत्या घरात गळफास, नाशकात 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मोबाईलवर गाणे लावून तिने जीवन संपवले असल्याचे समजते.

मोबाईल स्पीकरवर गाणं लावून राहत्या घरात गळफास, नाशकात 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या
इगतपुरी पोलीस स्टेशन

इगतपुरी : 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील तळेगाव भागात उघडकीस आली आहे. स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून तिने आयुष्य संपवलं. मात्र मोबाईलवर स्पीकर सुरु करुन गाणे ऐकता ऐकता केलेल्या या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. इगतपुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मोबाईलवर गाणे लावून तिने जीवन संपवले असल्याचे समजते. इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास कार्य सुरू केले आहे. मात्र तिने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने तळेगाव भागात हळहळ व्यक्त होत आहे.

नागपुरातही विद्यार्थ्याची आत्महत्या

दुसरीकडे, मेरिटचा विद्यार्थी असलेल्या आणि नेहमीच दूरदर्शी विचार मांडणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रद्युम्न मयुरेश चेंडके (वय 19 वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. घरची मंडळी झोपल्यानंतर राहत्या घरातच त्याने आयुष्याची अखेर केली. नागपूर एमआयडीसीतील लक्ष्मी पार्क सूतगिरणी (वाघधरा) परिसरात ही घटना उघडकीस आली.

प्रद्युमनने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र चेंडके कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रद्युम्नच्या बहिणी शोकसागरात बुडाल्या आहेत. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या, पतीच्या तक्रारीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल

रक्षाबंधनालाच बहिणींच्या मनाला चटका, नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI