रक्षाबंधनालाच बहिणींच्या मनाला चटका, नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

मेरिटचा विद्यार्थी असलेल्या आणि नेहमीच दूरदर्शी विचार मांडणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रद्युम्न मयुरेश चेंडके (वय 19 वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे.

रक्षाबंधनालाच बहिणींच्या मनाला चटका, नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 9:02 AM

नागपूर : राखीपौर्णिमेला बहीण भावाच्या हाती मायेचा धागा बांधते आणि त्याच्यावर आपल्या रक्षणाची जबाबदारी सोपवते. पण हा आनंदी क्षण सोडून भावाने बहिणीच्याच डोळ्यात अश्रू आणले. कुटुंबीय झोपल्यानंतर 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नागपुरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं?

मेरिटचा विद्यार्थी असलेल्या आणि नेहमीच दूरदर्शी विचार मांडणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रद्युम्न मयुरेश चेंडके (वय 19 वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. घरची मंडळी झोपल्यानंतर राहत्या घरातच त्याने आयुष्याची अखेर केली.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

नागपूर एमआयडीसीतील लक्ष्मी पार्क सूतगिरणी (वाघधरा) परिसरात ही घटना उघडकीस आली. मात्र प्रद्युमनने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र चेंडके कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रद्युम्नच्या बहिणी शोकसागरात बुडाल्या आहेत. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेॉ

सुनेच्या त्रासामुळे सासऱ्यांची आत्महत्या

दुसरीकडे, सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. ही घटना यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप येथे घडली. सून संध्या सासऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत जेलमध्ये टाकण्याची धमकी देत होती. यामुळे साहेबराव दवणे यांना मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी खिशात चिठ्ठी लिहून ठेवली. यावरून त्यांचा मुलगा सुरज साहेबराव दवणे याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

संबंधित बातम्या :

ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या, पतीच्या तक्रारीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.