AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर

कोरोना संसर्ग आढळला असून ब्लॅक फंगस झाल्यास खूप वेदना सहन कराव्या लागतील या भीतीने मंगळुरुत एका जोडप्यानं आत्महत्या केली. मात्र, आता मृत्यूनंतर शवविच्छेदन केलं असता अहवालात धक्कादायक खुलासा झालाय.

ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर
Mangalore Couple Suicide
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 11:29 AM
Share

बंगळुरू : कोरोना संसर्ग आढळला असून ब्लॅक फंगस झाल्यास खूप वेदना सहन कराव्या लागतील या भीतीने मंगळुरुत एका जोडप्यानं आत्महत्या केली. मात्र, आता मृत्यूनंतर शवविच्छेदन केलं असता अहवालात धक्कादायक खुलासा झालाय. या जोडप्यानं ज्या कोरोना आणि ब्लॅक फंगसच्या भितीपोटी आत्महत्या केली तसं काही झालेलं नसल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलंय. या दाम्पत्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलाय. यामुळे या जोडप्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुसाईड नोटमध्ये पतीने म्हटलं, “माझ्या पत्नीला मधुमेह आहे. न्यूज चॅनल्समध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या मधुमेही रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांना ब्लॅक फंगसचा धोका आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमध्ये निकामी होऊ शकतात. त्याची किंमत चुकवावी लागू शकते, त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाय.”

रमेश (40) आणि गुना सुवर्णा (35) असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. दोघेही मंगलोरमध्ये एका आपर्टमेंटमध्ये राहात होते. रमेशची पत्नी गुना सुवर्णा ही मधुमेहाने पीडित होती.

सुसाईड नोट

गेल्या काही दिवसापूर्वी दोघांनाही कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे व्यथित झालेल्या दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी या दाम्पत्याने आपल्या मेसेजची ऑडिओ क्लिप शहर पोलीस आयुक्त एन शशीकुमार यांना पाठवली होती. यामध्ये त्यांनी ब्लॅक फंगसमुळे भीती वाटत असल्याचं म्हणत आम्ही आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं होतं.

पोलिसांकडून शोधाशोध 

यावर पोलीस आयुक्तांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन केलं. त्यांनी तातडीने या दाम्पत्याचा शोध सुरु केलं. इतकंच नाही तर त्यांनी मीडियालाही आवाहन करुन, या दाम्पत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत या दाम्पत्याने आत्महत्या केली होती.

रमेशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गुना सुवर्णाच्याही आरोग्याच्या समस्येबाबत लिहिलं आहे. गुना सुवर्णाला अपत्य होत नसल्याने, ती समाजात वावरताना दचकत होती. सातत्याने तिला विचारणा होत असल्याने तिला अवघडल्यासारखं वाटत होतं.

अंत्यसंस्कारासाठी 1 लाख, घरमालकांची माफी

पुढे पत्नीनेही याच सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ती म्हणते, “मी आणि माझ्या पतीने ठरवलं आहे की आमच्यावर पारंपारिक अंत्यसंस्कार व्हावेत, त्यासाठी आम्ही 1 लाख रुपये ठेवले आहेत. त्यासाठी पोलीस आयुक्त एन शशीकुमार, शरण पंपवेल आणि सत्यजीत सुरथकल यांनी आमच्या अंत्यसंस्कारासाठी सहकार्य करावं”

इतकंच नाही तर घरातील साहित्य गरिबांना वाटा, आम्ही आमच्या घरमालकांची माफी मागतो, असंही या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.

हेही वाचा :

आतल्या वेदनांची जखम, नैराश्याने घात, ‘छावा’ संघटनेचा तालुकाध्यक्ष, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षापुढे हार, टोकाचं पाऊल

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्यानं डॉक्टरचा मृत्यू? अमित देशमुखांचे चौकशीचे आदेश

वयोवृद्ध महिलेला निद्रानाश, घरात सून-नात असताना बाल्कनीत टोकाचं पाऊल, आत्महत्या की घातपात? नागपुरात खळबळ

व्हिडीओ पाहा :

Couple of Mangalore who suicide after fear of black fungus corona report negative

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.