नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्यानं डॉक्टरचा मृत्यू? अमित देशमुखांचे चौकशीचे आदेश

नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत डॉक्टरांच्या कुटुंबाने रँगिंगमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्यानं डॉक्टरचा मृत्यू? अमित देशमुखांचे चौकशीचे आदेश
जाणकारांची मते घेऊन नीट परिक्षेबाबत अंतिम निर्णय घेणार
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 2:37 PM

नाशिक : नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत डॉक्टरांच्या कुटुंबाने रँगिंगमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. डॉ. स्वप्निल महारुद्र शिंदे असं या मृत डॉक्टरांचं नाव आहे. ते गायनॉकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंगमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.

कॉलेजकडून मृत डॉक्टरवर मानसोपचार सुरू असल्याचा दावा

मृत डॉक्टर स्वप्निल महारुद्र शिंदे यांच्या कुटुंबाने रॅगिंग करणाऱ्या 2 मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. कॉलेज प्रशासनाने मात्र, कुटुंबाच्या आरोपांचं खंडण केलंय. आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळो वेळी सहकार्य केल्याचा दावा कॉलेज प्रशासनाने केलाय. तसेच मृत विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू असल्याचंही कॉलेज प्रशासनाने म्हटलंय. मानसिक स्थिती ठीक नसल्याने मृत डॉक्टर विद्यार्थ्यांच्या आईला मुलासोबत होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिल्याचाही दावा कॉलेजने केलाय.

सरकार या प्रकरणाची चौकशी करेल, अमित देशमुखांकडून तपासाची घोषणा

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले, “हा मृत्यू नेमकं का झाला, कशामुळे झाला याची अधिकृत माहिती आलेली नाही. पालकांचं म्हणणं एक आहे, महाविद्यालयाचं म्हणणं एक आहे. याची चौकशी शासन स्तरावर घोषित करण्यात येतेय. सरकार या प्रकरणाची चौकशी करेल. रॅगिंग या प्रकारात खूप नियंत्रण मिळवलं आहे. याबाबत प्रतिबंध शासनाने घातले आहेत. हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोस्ट मोर्टम व्हायचं आहे. मृत डॉक्टरांच्या पालकांशी संवाद साधू.”

हेही वाचा :

जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, 28 वर्षीय पतीचा अंगणातील झाडाला गळफास

वयोवृद्ध महिलेला निद्रानाश, घरात सून-नात असताना बाल्कनीत टोकाचं पाऊल, आत्महत्या की घातपात? नागपुरात खळबळ

सारं काही संपलं, घरातल्या कर्त्या पुरुषाच्या जाण्याचं दु:ख, पत्नी-मुलीचं टोकाचं पाऊल, हृदयद्रावक घटना

व्हिडीओ पाहा :

Death of a medical student doctor in Nashik Family allege ragging

Non Stop LIVE Update
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.