जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, 28 वर्षीय पतीचा अंगणातील झाडाला गळफास

अंगणातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरजचा मृतदेह आढळला होता, तर घरात रत्नमाला जखमी अवस्थेत सापडली होती. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान रत्नमालाचा देखील मृत्यू झाला.

जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, 28 वर्षीय पतीचा अंगणातील झाडाला गळफास
चंद्रपुरात पतीकडून पत्नीची हत्या
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 7:34 AM

चंद्रपूर : पत्नीची हत्या करुन पतीने झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. अंगणातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह आढळला होता, तर पत्नी घरात जखमी अवस्थेत सापडली होती. मात्र उपचारादरम्यान तिनेही अखेरचा श्वास घेतला आहे. पतीने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील आमराई वॉर्ड परिसरात मंगळवारी ही घटना उघडकीस आली. सुरज माने (वय 28 वर्ष) आणि रत्नमाला माने (वय 25 वर्ष) असं मयत पती-पत्नीचं नाव आहे. मंगळवारी सकाळी घराच्या अंगणातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरजचा मृतदेह आढळला होता, तर घरात रत्नमाला जखमी अवस्थेत सापडली होती. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान रत्नमालाचा देखील मृत्यू झाला.

पत्नीला मारहाणीनंतर पतीचा गळफास

प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून सुरजने सोमवारी रात्री पत्नीला जबर मारहाण केली होती. मारहाणीत पत्नी जखमी झाल्याने मंगळवारी सकाळी गळफास घेऊन सुरजने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. तर पतीच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे रत्नमालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जखमांवरुन स्पष्ट झाले आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नालासोपाऱ्यात 33 वर्षीय युवकाची आत्महत्या

नालासोपारा भागात 33 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात समोर आली होती. आर्थिक विवंचनेला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला होता. पत्नी आणि दोन मुलं घरात नसल्याची संधी साधत तरुणाने टोकाचं पाऊल उचललं होतं.

तरुणाची पत्नी आणि दोन लहान मुलं सकाळी दहा वाजताच्या सुमारास सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक त्रासातूनच त्याने टोकाचं पाउल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नालासोपारा पोलिसांनी आकस्मिक गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास

मायलेकीचे एकाच प्रियकराशी प्रेमसंबंध, पाळत ठेवणाऱ्या तरुणाची हत्या

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.