AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मायलेकीचे एकाच प्रियकराशी प्रेमसंबंध, पाळत ठेवणाऱ्या तरुणाची हत्या

आरोपी रणजीत पाले याचे भरत नावाच्या तरुणाची आई आणि बहीण अशा दोघींशीही अनैतिक संबंध होते. भरतने नवीनला याविषयी माहिती काढण्यास सांगितलं. त्यानुसार दोघींवर पाळत ठेवून नवीन त्याची माहिती भरतला देत होता

मायलेकीचे एकाच प्रियकराशी प्रेमसंबंध, पाळत ठेवणाऱ्या तरुणाची हत्या
हेरगिरी करणाऱ्या तरुणाची हत्या
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 1:55 PM
Share

लखनौ : हेरगिरी हा संपूर्ण जगासाठीच सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हेरगिरीच्या नादात तरुणाला जीव गमवावा लागला. आरोपी मायलेकीचे एकाच व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. याविषयी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यामुळे तिघांनी संगनमताने प्लॅन आखला आणि प्रियकराने पाळत ठेवणाऱ्या तरुणाची हत्या केली. आरोपी प्रियकर आणि मायलेकींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

कानपूरमधील कोहना पोलीस ठाण्याअंतर्गत रविवारी ही घटना घडली. नवीनचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी 24 तासांच्या आत उलगडा केला. मुख्य आरोपी रणजीत पाले आणि मायलेकीला अटक झाली आहे. आरोपी रणजीत पाले याचे भरत नावाच्या तरुणाची आई आणि बहीण अशा दोघींशीही अनैतिक संबंध होते. भरतने नवीनला याविषयी माहिती काढण्यास सांगितलं. त्यानुसार दोघींवर पाळत ठेवून नवीन त्याची माहिती भरतला देत होता. त्यानंतर भरत आपल्या बहीण आणि आईला मारहाण करत असे.

विजेच्या तारेने गळा दाबून हत्या

आपल्यावर पाळत ठेवणाऱ्या नवीनचा काटा काढण्याची योजना तिघांनी आखली. रणजीतने आधी नवीनशी ओळख वाढवली. त्यानंतर टेस्कोमधील निर्जन भागात त्याला नेलं. तिथे विजेच्या तारेने गळा दाबून त्याची हत्या केली. पोलिसांना हत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान संशयाची सुई रणजीतकडे वळली. कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांकडे हत्येची कबुली दिली. आपल्या प्रेमसंबंधांची माहिती दिल्यामुळेच त्याचा जीव घेतल्याचं रणजीतने सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि मायलेकींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बीडमध्ये विवाहित नर्सची आत्महत्या 

दुसरीकडे, बीडमध्ये सोनाली जाधव या विवाहित नर्सचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटात पालीजवळ सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मांजरसुंबा घाटातील एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचा दावा

सोनाली बीडमधील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी करत असल्याची माहिती आहे. प्रेम संबंधातून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. सोनालीचा प्रियकर अक्षय आव्हाड हा देखील विवाहित होता. त्याने लग्नास नकार दिल्याने सोनाली जाधवने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास

वयाच्या 20 व्या वर्षी बॉयफ्रेण्डसोबत विषप्राशन, अशी झाली होती अभिनेत्री प्रत्युषाच्या आयुष्याची अखेर

(Man killed for spying on mother daughter duo affair with same boyfriend)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.