पत्नी आणि मुलं खरेदीसाठी गेली, 33 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबईजवळच्या नालासोपारा पश्चिमेला निळेमोरे येथे श्री गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या राकेश जाधवने आत्महत्या केली. तो व्यवसायाने इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर होता.

पत्नी आणि मुलं खरेदीसाठी गेली, 33 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
नालासोपाऱ्यात तरुणाची आत्महत्या

नालासोपारा : नालासोपारा भागात 33 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. पत्नी आणि दोन मुलं घरात नसल्याची संधी साधत तरुणाने टोकाचं पाऊल उचललं.

मुंबईजवळच्या नालासोपारा पश्चिमेला निळेमोरे येथे श्री गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या राकेश जाधवने आत्महत्या केली. तो व्यवसायाने इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर होता. राकेश गेले काही महिने आर्थिक विवंचनेत होता. तो इलेक्ट्रिशनची कामे घ्यायचा, मात्र मागील काही महिन्यांपासून त्याला कामं मिळत नव्हती. त्यांच्या घराच्या कर्जाचे 17 हजारांचे हप्तेही कित्येक महिन्यापासून थकले होते.

नेमकं काय घडलं?

राकेशची पत्नी आणि दोन लहान मुलं सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक त्रासातूनच त्याने टोकाचं पाउल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नालासोपारा पोलिसांनी आकस्मिक गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

बीडमध्ये विवाहित नर्सची आत्महत्या 

दुसरीकडे, बीडमध्ये सोनाली जाधव या विवाहित नर्सचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटात पालीजवळ सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मांजरसुंबा घाटातील एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचा दावा

सोनाली बीडमधील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी करत असल्याची माहिती आहे. प्रेम संबंधातून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. सोनालीचा प्रियकर अक्षय आव्हाड हा देखील विवाहित होता. त्याने लग्नास नकार दिल्याने सोनाली जाधवने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास

वयाच्या 20 व्या वर्षी बॉयफ्रेण्डसोबत विषप्राशन, अशी झाली होती अभिनेत्री प्रत्युषाच्या आयुष्याची अखेर

मायलेकीचे एकाच प्रियकराशी प्रेमसंबंध, पाळत ठेवणाऱ्या तरुणाची हत्या

(Nalasopara 33 years old man allegedly committed Suicide due to financial losses)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI