औरंगाबाद : कोरोना संकट काळ सध्या प्रचंड घातक आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांच्या उद्योगधंद्यांवर परिणाम पडला. त्यामुळे अनेक तरुण, व्यापारी, उद्योगपती नैराश्यात गेले. काही जणांनी नैराश्यात जावून आत्महत्या केल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. औरंगाबादेमध्ये देखील अशीच काहिशी घटना समोर आली आहे. औरंगाबादेत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.