‘कार हळू चालव’ म्हटल्याने डोक्यात गेला राग, लाथाबुक्क्यांनी मारलं, रक्तबंबाळ व्यक्तीचा अखेर मृत्यू

संतापलेल्या कारचालकानं नातेवाईकांसोबत मिळून केली हाणामारी, मारमारीनंतर जखमी इसमाचा रुग्णालयात नेताना मृत्यू, अजिंठा पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

'कार हळू चालव' म्हटल्याने डोक्यात गेला राग, लाथाबुक्क्यांनी मारलं, रक्तबंबाळ व्यक्तीचा अखेर मृत्यू
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 12:23 PM

औरंगाबाद: अगदी किरकोळ कारणावरून कधी कुणाला राग येईल आणि त्याचे काय परिणाम होतील, हे सांगता येत नाही. औरंगाबादमध्येही असाच एक प्रकार घडला. साध्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.  औरंगाबाद अजिंठा पोलिस (Police) ठाण्यात नुकताच अशा प्रकरणात हत्येचा (Aurangabad murder) गुन्हा दाखल झाला आहे. (car driver got angry after being told to drive slowly killed one at Aurangabad, Maharashtra crime news)

‘कार हळू चालव’ म्हटल्यानंतर सटकली

अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा प्रकार आहे. मोहंमद शफियोद्दीन अब्दुल रेहमान (वय वर्षे50) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर सादीक ऊर्फ मुन्नाजन मोहंमद (वय-28), शेख जावेदजान मोहंमद शेख (वय-32) आणि शेख अथर जाफर बेग (वय-38) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी सादीक हा गुरुवारी मध्यरात्री आपल्या कारने वेगाने जात होता. दरम्यान त्याची कार मोहंमद रेहमान यांच्या घरासमोरून गेली. यात मोहंमद रेहमान यांना सादीकच्या कारचा कट बसला. भरधाव वेगाने कार बाजूने निघून गेल्याने मोहंमद रेहमान घाबरले. त्यांनी सादीकला ‘कार हळू चालव’ अशी समज दिली. एवढं बोलताच सादिकचा राग अनावर झाला. त्याने कार थांबवून रेहमान यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. रस्त्यावरच भांडणं सुरू झाल्यानंतर तिथे जमलेल्या आजू-बाजूच्या लोकांनी त्यांच्यातील वाद मिटवला. त्यानंतर सादिक घटनास्थळावरून निघून गेला. पण…

हाणामारीसाठी नातेवाईकांना घेऊन आला

जमलेल्या लोकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी सादिक घरी निघून गेला. पण त्याच्या डोक्यातील राग काही शांत झाला नाही. घरी गेल्यानंतरही त्याने संबंधित घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सादीकचे नातेवाईक शेख जावेदखान, मोहंमद शेख आणि अथर शेख हे पुन्हा घटनास्थळी पोहोचले.

रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

रागाच्या भरात पुन्हा मोहम्मद रेहमान यांच्या घरी पोहोचलेल्या नातेवाईकांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. यात मोहम्मद रेहमान रक्तबंबाळ झाले. आरोपी निघून गेल्यानंतर काही नागरिकांनी मोहम्मद रेहमान यांना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रुग्णाची स्थिती अधिकच गंभीर असल्याने त्याला औरंगाबाद इथं उपचारासाठी नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार शहरात नेत असताना, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला

तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी, अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सादीक ऊर्फ मुन्नाजन मोहंमद , शेख जावेदजान मोहंमद शेख,आणि शेख अथर जाफर बेग अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. अजिंठा पोलिस पुढील तपास करत आहेत. (car driver got angry after being told to drive slowly killed one)

इतर बातम्या:

मुलाकडून पित्याची हत्या, मृतदेह घरातच पुरला

औरंगाबादच्या कब्रस्तानात 25 वर्षीय तरुणाचे हात तोडले, RBI परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हत्या

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.