औरंगाबादच्या कब्रस्तानात 25 वर्षीय तरुणाचे हात तोडले, RBI परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हत्या

औरंगाबादच्या कब्रस्तानात 25 वर्षीय तरुणाचे हात तोडले, RBI परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हत्या
औरंगाबादमध्ये तरुणाची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

Aurangabad Crime News : औरंगाबादमध्ये कब्रस्तानात एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महापालिकेच्या शेजारी असलेल्या कब्रस्तानात या तरुणाचा मृतदेह आढळला.

सचिन पाटील

|

Apr 09, 2021 | 11:32 AM

औरंगाबाद : एकीकडे कोरोनाचं थैमान सुरु असताना, तिकडे औरंगाबादमध्ये गुन्हेगारी (Aurangabad youth Murder) काही थांबण्याचं नाव घेत नाही. औरंगाबादमध्ये कब्रस्तानात एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महापालिकेच्या शेजारी असलेल्या कब्रस्तानात या तरुणाचा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली. विकास चव्हाण असं मृत तरुणाचं नाव आहे. (Youth who came to give RBI exam murdered at Aurangabad Kabrastan Maharashtra crime news )

धक्कादायक म्हणजे विकास हा रिझर्व्ह बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादेत आल्याची माहिती मिळत आहे. हात तुटलेल्या स्थितीत रक्त बंबाळ अवस्थेत त्यााच मृतदेह आढळला आहे. त्यामुळे या थरारक हत्याकांडाने परिसर हादरुन गेला आहे.

बेदम मारहाण करुन हत्या

विकास चव्हाणला बेदम मारहाण करुन, त्याचे हात तोडून, हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. राज्यभरात रात्रीची संचारबंदी असूनही हे हत्याकांड घडल्याने पोलिसांवर आता गुन्हे रोखण्यासोबत गर्दी आवरण्याचं दुहेरी काम आहे.

दरम्यान, या हत्येच्या तपासासाठी पोलीस आणि विविध पथके घटनस्थळी दाखल झाली. त्यानंतर तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला.

औरंगाबादमध्ये कोरोनाचं थैमान

औरंगाबाद शहरातील वाढत्या कोरोनाची केंद्रीय पथकाने पाहणी केली आहे. काल सकाळी केंद्रीय पथकाचे तीन सदस्य औरंगाबाद शहरात दाखल झाले होते. यावेळी या पथकाने बजाज विहार येथील कोविड सेंटर, वाळूज येथील कोरोना रुग्णालय, घाटी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यसॊबत या पथकाची भेटही झाली यावेळी या पथकाने कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याची गरज असल्याच्या सूचना दिल्या

संबंधित बातम्या

पाच वर्षांपूर्वी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन, तरीही शुल्लक कारणावरुन पत्नीवर गोळी झाडली

(Youth who came to give RBI exam murdered at Aurangabad Kabrastan Maharashtra crime news )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें