ग्रामपंचायत वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

ग्रामपंचायत वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचं मतदान झालं तरी या निवडणुकांमुळे सुरू झालेले वाद काही थांबताना दिसत नाहीत. (brutal murder of bjp activists in aurangabad)

भीमराव गवळी

|

Jan 16, 2021 | 10:49 AM

औरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचं मतदान झालं तरी या निवडणुकांमुळे सुरू झालेले वाद काही थांबताना दिसत नाहीत. औरंगाबाद येथेही ग्रामपंचायत वादातून भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून या गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना पकडलं जात नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण तापले आहे. (brutal murder of bjp activists in aurangabad)

औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी गावात ही घटना घडली. हरिसिंग गुशिंगे असं या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. काल शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास गुशिंगे यांची हत्या झाली. दिवसभर मतदान होतं. त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मतदानाच्या धामधुमीत व्यस्त होते. संध्याकाळी थोडी उसंत मिळाल्याने सर्वजण घरी आले होते. मात्र रात्री 10 नंतर गुशिंगे यांच्या हत्येची बातमी आल्यानंतर गावकरी एकदम हादरून गेले. त्यामुळे गावकऱ्यांनी गुशिंगे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गुशिंगे यांची हत्या केल्याचं गावकऱ्यांना समजलं. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचं एकच वातावरण तयार झालं.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे. गुशिंगे यांची हत्या कुणी केली याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र, ग्रामपंचायतवादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत गुशिंगे यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत गुशिंगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने जोडवाडीतील वातावरण तापलं आहे. (brutal murder of bjp activists in aurangabad)

संबंधित बातम्या:

पत्नी सासरी परतली नाही म्हणून पतीचं टोकाचं पाऊल, संपूर्ण कुटुंबाला जिवंत पेटवलं

सोने व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून बेदम मारहाण, सव्वा दोन कोटीचे 4 किलो सोने लंपास

भरदिवसा घरात घुसून सीएची हत्या; पालघरमध्ये खळबळ

(brutal murder of bjp activists in aurangabad)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें